नवी दिल्ली: कोणत्याही क्रीडा मैदानावर खेळाची मजा अमर्याद असते. पण खेळ कोणताही असो त्याचे काही नियम असतात. गोष्टी नियमात आणि एका मर्यादेत असतील तरच खेळाची प्रतिष्ठा कायम राहते. ऑस्ट्रेलियात झालेल्या एका रग्बी सामन्यात एका महिलेने असा काही प्रकार केला ज्यावरून जगभर चर्चा सुरू झाली.

वाचा- सलग चार पराभवानंतर थेट नीता अंबानींचा फोन आला; मुंबईच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण

भारतात क्रिकेट सामन्यात अनेकदा प्रेक्षक मैदानात प्रवेश करतात आणि खेळाडूंसोबत फोटो काढण्याचा किंवा त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतात. परदेशात देखील असे चाहते असतात. पण ऑस्ट्रेलियात जो प्रकार झाला तो थोडा धक्कादायक होता. रग्बी सामन्यात एक महिला चक्क टॉपलेस होऊन मैदानात घुसली. यामुळे सामना काही काळासाठी थांबवावा लागला. Gold Coast Titans आणि Parramatta Eels या दोन संघात मॅच सुरू होती. तेव्हा प्रेक्षकांमधील एक महिलेने मैदानात प्रवेश केला. लोकांना धक्का तेव्हा बसला जेव्हा ही गोष्ट लक्षात आली की तिने टॉपलेस होऊन मैदानात प्रवेश केला. संबंधित महिलेचे नाव जावोन जोहानसन असल्याचे समजते.

वाचा-गुजरात टायटन्सच्या पहिल्या पराभवाला कर्णधार जबाबदार; हार्दिक कोणती चूक केली?

जावोनने मैदानात प्रवेश करताच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिला घेरले आणि मैदानाबाहेर नेले. पण या प्रकारावर आता सोशल मीडियात वाद सुरू झाला आहे. पोलिसांनी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिला ज्या पद्धतीने मैदानाबाहेर नेले ती पद्धत चुकीची असल्याचे काहींनी म्हटले आहे. या उटल काहींनी जावोनने जो काही प्रकार केला त्यावर नाराजी व्यक्त केलीय.

वाचा-षटकार मारताच फलंदाज मैदानावर कोसळला; IPLमधील घटना, पाहा झाले तरी काय

महिला प्रेक्षक

का झाली टॉपलेस

मैदानावर टॉपलेस किंवा नग्न स्वरुपात एखाद्या प्रेक्षकाने येण्याची ही पहिली वेळ नाही. अनेकदा कोणत्या तरी गोष्टीचा निषेध करण्यासाठी असे प्रकार केले जातात. पण जावोन जोहानसन टॉपलेस झाली कारण तिच्या मैत्रिणींनी तिला चॅलेंज दिले होते. जावोनने मैत्रिणींनी दिलेले चॅलेंज पूर्ण करण्यासाठी हा प्रकार केला. यात विचार करण्यासारखे काही नव्हते. त्यांनी मला चॅलेंज दिले होते. मला जे करायचे होते ते मी केले. सुरक्षा कर्मचाऱ्यांचा कोणताही दोष नाही. मैदानात टॉपलेस येण्याआधी स्टॅड्समध्ये तिने एक व्हिडिओ देखील शूट केला होता.

वाचा- Deepak Chahar: विजयाचा पत्ता नाही, आता दीपक सोडणार चेन्नईची साथ

टॉपलेस महिला चाहती

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here