नवी दिल्ली: गुगल प्ले स्टोअरवर ७० मिलियनहून अधिक डाऊनलोड असलेला हा सर्वात लोकप्रिय मल्टीप्लेअर गेम आहे. अन्य देशात नाही तर भारतात देखील हा गेम प्रचंड लोकप्रिय आहे. PUBG सारखे अनेक गेम याआधी आले पण त्यांना इतकी लोकप्रियता मिळाली नव्हती. सर्व सामान्य लोक नाही तर भारतीय क्रिकेट संघातील काही खेळाडू हा गेम निमितपणे खेळतात. भारतीय क्रिकेट संघातील सपोर्ट स्टाफनी दिलेल्या माहितीनुसार काही भारतीय क्रिकेटपटू हा गेम नियमीतपणे खेळतात. इतकच नव्हे तर त्यासाठी त्यांनी टॅब्स विकत घेतले आहेत आणि रिकाम्या वेळेत ते PUBG खेळतात. जाणून घेऊयात असे कोणते क्रिकेटपटू आहेत जे नियमीतपणे PUBG खेळतात…

वाचा-
PUBG खेळण्यात आघाडीवर असलेला भारतीय क्रिकेटपटू म्हणजे माजी कर्णधार होय. धोनीचे नाव या यादीत अव्वल स्थानी वाचून अनेकांना धक्का बसले. पण भारतीय संघात धोनी हा पहिला खेळाडू आहे ज्याने PUBG डाऊनलोड केला. आयपीएलच्या काळात केदार जाधवने या गेमबद्दल धोनीला सांगितले. त्यानंतर तो देखील हा गेम खेळू लागला. धोनी हा गेम अतिशय आक्रमकपणे खेळतो. PUBG खेळण्यासाठी धोनी, जाधव, चहल आणि धवन यांनी मिळून एक टीम तयार केली होती. हे सर्व जण जेवण झाल्यानंतर किंवा प्रवासात खेळायचे.

वाचा-

केदार जाधवमुळे PUBG गेम भारतीय संघातील खेळाडूंना माहीत झाला. या गेममध्ये केदार हा टीम लिडर मानला जातो. कारण त्याला हा गेम सर्वात जास्त माहीत आहे. केदारमुळेच मोहम्मद शमीने देखील हा गेम खेळण्यास सुरूवात केली.

वाचा-

पाठोपाठ जर सर्वात जास्तवेळ PUBG कोण खेळत असेल तर तो म्हणजे फिरकीपटू युजवेंद्र चहल होय. चहल त्याच्या इंस्टाग्रामवर गेम जिंकल्याच्या पोस्ट शेअर करत असतो. चहल अनेक वेळा PUBG खेळताना दिसला आहे. चहल आणि केदार जाधव एकाच टीमकडून PUBG खेळतात.

मोहम्मद शमीला सर्व जण टॅब प्लेअर या नावाने बोलवतात. शमी त्याच्या घरातील सदस्यांसोबत हा गेम खेळायचा. जाधवच्या सांगण्यावरून तो टीममधील खेळाडूंसोबत PUBG खेळतो. यासाठी त्याने टॅब विकत घेतला आहे.

भारतीय संघातील गब्बर शिखर धवन देखील PUBG खेळतो. धवन संघातील खेळाडूंसोबत नाही तर पत्नी सोबत PUBG गेम खेळतो.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

160 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here