नवी दिल्ली: करोना व्हयरसमुळे जगातील सर्व व्यवहार ठप्प आहेत. क्रीडा क्षेत्रातील सर्व सामने स्थगित करण्यात आले आहेत. भारतीय क्रिकेटपटू लॉकडाऊनच्या काळात घरी वेळ घालवत असून या काळात काही खेळाडू जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने आतापर्यंत कोणालाही माहीत नसलेला एक प्रसंग सांगितला आहे.

वाचा-
भारतीय क्रिकेट संघाने २ एप्रिल २०११ रोजी महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेचा पराभव करत वर्ल्ड कप जिंकला होता. वनडे क्रिकेटमधील भारतीय संघाचे हे दुसरे विजेतेपद ठरले होते. हरभजन सिंगने या वर्ल्ड विजेतेपदासंदर्भातील एक आठवण चाहत्यांसोबत शेअर केली.

वाचा-
वर्ल्ड कपचे विजेतेपद ही एक अशी गोष्ट होती की ज्याचे स्वप्न आम्ही सर्वांनी मिळून पाहिले होते. विजेतेपदाचा चषक हाती घेणे हा एक खास अनुभव होता. संघातील सर्व खेळाडू भावूक झाले होते. आनंदाने आमच्या डोळ्यातून आश्रू येत होते, असे हरभजनने सांगितले.

वाचा-
त्या रात्री आम्ही मिळालेल्या पदकासह झोपलो होतो. त्या दिवशी प्रथम सचिन तेंडुलकरने सर्वांसमोर डान्स केला. मी माझ्या करिअरमध्ये प्रथमच सचिनला डान्स करताना पाहत होतो. सचिन आजूबाजूच्या लोकांचा विचार न करता डान्स करत होता. तो क्षण मला नेहमी लक्षात राहिल असे हरभजन म्हणाला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here