वाचा-
इटलीचे धावपटू दोनातो साबिया यांचे निधन झाले. त्यांना करोनाची लागण झाली होती. ते ५६ वर्षांचे होते. धक्कादायक म्हणजे काही दिवसांपूर्वी दोनातो यांचे वडिलांचे करोनामुळेच निधन झाले होते. या व्हायरमुळे क्रीडा क्षेत्रातील निधन झालेले दोनातो हे सहावे खेळाडू ठरले आहेत.
वाचा-
दोनातो यांनी १९८४च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये ५ वे तर १९८८ च्या सोल ऑलिम्पिक स्पर्धेत सातवे स्थान मिळवले होते. त्यांनी १९८४च्या युरोपियन इंडोर चॅम्पियनशिप स्पर्धेत ८०० मीटरमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. करोना व्हायरसमुळे एखाद्या ऑलिम्पिकपटूचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
वाचा-
याआधी बुधवारी स्वित्झिर्लंडमध्ये आइस हॉकीपटू रोजर शॅपो यांचे करोनामुळे निधन झाले होते. ते ७९ वर्षांचे होते. शॅपो यांनी १०० हून अधिक सामने खेळले होते.
वाचा-
करोनामुळे सर्व प्रथम स्पेनमधील एका फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकाचा त्यानंतर पाकिस्तानचे दिग्गज स्क्वॅश खेळाडू आजम खान यांचे लंडनमध्ये करोना व्हायरसने मृत्यू झाला होता. खान यांनी १९५९ ते १९६१ या काळात सलग ब्रिटन ओपनचे विजेतेपद मिळवले होते. तर इंग्लंडमधील काऊंटी क्रिकेट संघाचे अध्यक्ष डेव्हिड हॉजकिस, फ्रान्सच्या ऑलिम्पिक डी मार्शल फुटबॉल क्लबचे माजी अध्यक्ष पेप दिऑफ याचे करोनामुळे निधन झाले होते.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times