वाचा-
एका बाजूला भारतीय क्रिकेट संघातील सर्व खेळाडू घरी थांबले आहेत आणि देशभरातील नागरिकांना सोशल मीडियावरून घरी थांबण्याचे आवाहन करत आहेत. अशातच एका क्रिकेटपटूने मात्र लॉकडाऊनमधील नियमांचे उल्लंघन केले आहे. भारतीय क्रिकेट संघातील अष्ठपैलू खेळाडू ऋषी धवन चर्चेत आला आहे तो यामुळेच…
वाचा-
देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन असताना धवन गाडी घेऊन घराबाहेर पडला. गांधी चौकात त्याला पोलिसांनी थांबवले आणि लॉकडाऊनचा नियम तोडल्याबद्दल ५०० रुपयांचा दंड केला. धवनकडे लॉकडाऊनच्या काळात बाहेर पडण्यासारखे कोणताही कारण नव्हते. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली.
वाचा-
ऋषीने भारतीय क्रिकेट संघाकडून ३ वनडे आणि एक टी-२० सामना खेळला आहे. वनडेत त्याला दोन डावात फक्त १२ धावा करता आल्या. तर ३ सामन्यात त्याने एक विकेट घेतली होती. भारतीय संघाकडून त्याने १८ जून २०१६ रोजी अखेरचा सामना खेळला होता.
वाचा-
आयपीएलमध्ये ऋषी २००८ साली किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळला. पण त्यानंतर फिटनेसमुळे तो पाच वर्ष आयपीएल खेळू शकला नाही. २०१३ मध्ये मुंबई इंडियन्स संघाने त्याला विकत घेतले होते. तर २०१४ मध्ये तो पुन्हा पंजाबकडे गेला. आयपीएलमध्ये ऋषीने २६ सामन्यात १५३ धावा तर १८ विकेट घेतल्या आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times