नवी दिल्ली: क्रिकेटमध्ये कसोटी या प्रकाराला सर्वाधिक महत्त्व आहे. क्रिकेटची सुरुवातच कसोटीपासून झाली असल्यामुळेच एखाद्या खेळाडूचा दर्जा त्याच्या कसोटीमधील कामगिरीवर ठरवला जातो. कसोटी क्रिकेटनंतर वनडे आणि मग टी-२०ला सुरुवात झाली. क्रिकेटचे मुळ हे कसोटी असल्याचे आजही मानले जाते. पाच दिवस चालणाऱ्या या सामन्यात प्रत्येक दिवशी अनेक चढ-उतार पाहायला मिळतात. क्रिकेटच्या या प्रकारात दोन्ही संघांच्या कौशल्याची चाचणी होते आणि जो सर्वोत्तम खेळ करतो तो विजय होतो.

वाचा-

कसोटी क्रिकेटला १४५ वर्षांचा इतिहास आहे. कसोटीमध्ये अनेक महान फलंदाज झाले आहेत. पण इतक्या वर्षात कसोटीत फक्त ३१ वेळा झळकावण्यात फलंदाजांना यश आले.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिले त्रिशतक इंग्लंडच्या नावावर आहे. इंग्लंडच्या अँडी सॅडम यांनी एप्रिल १९३० मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध किंग्सटन मैदानावर त्रिशतकी खेळी केली होती. त्यांनी ३२५ धावा केल्या होत्या. कसोटी क्रिकेटमधील हे पहिले त्रिशतक होय.

वाचा-
त्यानंतर कसोटीत त्रिशतकाचा सिलसिला सुरू झाला पण आतापर्यंत फक्त ३१ वेळा अशी कामगिरी करता आली आहे. कसोटीमध्ये अखेरचे त्रिशतक ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरच्या नावार आहे. त्याने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानविरुद्ध ही कामगिरी केली होती. वॉर्नरने तेव्हा नाबाद ३३५ धावा केल्या होत्या. तर ऑस्ट्रेलियाकडून एखाद्या फलंदाजाने त्रिशतक करण्याची आठवी वेळ होती.

वाचा-
कसोटीत सर्वाधिक त्रिशतक झळकावण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. याबाबत दुसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिज असून त्यांनी ६ वेळा अशी कामगिरी केली आहे. इंग्लंड संघाकडून ५ वेळा तर भारताकडून तीन वेळा त्रिशतक झाले आहे. भारताकडून विरेंद्र सेहवागने दोन त्रिशतके केली आहेत. तर एक त्रिशतक करूण नायरच्या नावावर आहे. याबाबत पाकिस्तान भारतापेक्षा पुढे आहे. पाकच्या नावावर ४ त्रिशतके आहेत.

वाचा-

कसोटी सर्वाधिक त्रिशतक करणारे देश

ऑस्ट्रेलिया- ८
वेस्ट इंडिज-६
इंग्लंड-५
पाकिस्तान-४
भारत-३
श्रीलंका-३
दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड- प्रत्येकी १ वेळा

वाचा-

कसोटीत सर्वाधिक धाव संख्येचा विक्रम वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराच्या नावावर आहे. त्याने नाबाद ४०० धावा केल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन ३८० धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या स्थानावर लाराच असून त्याने ३७५ धावा केल्या होत्या. तर लंकेचा महेला जयवर्धने ३७४ धावांसह चौथ्या स्थानावर आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here