करोनाशी लढण्याठी जो मदतनिधी लागेल तो आपण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांमधून जमा करू शकतो, असा प्रस्ताव पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने बुधवारी ठेवला होता. या प्रस्तावावर काही तासांपूर्वी भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले. त्याचबरोबर आता विश्वविजेत्या संघातील गोलंदाज मदन लाल यांनीही शोएबला भारत-पाक सामन्यांबाबत खडे बोल सुनावले आहेत.

याबाबत मदन लाल म्हणाले की, ” भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामने खेळवायला हवेत, हे ठरवणारा शोएब अख्तर कोण आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये सामने खेळवायचे की नाहीत, हा निर्णय दोन्ही देशांच्या सरकारचा आहे. भारत सरकारने ठरवायला हवं की, पाकिस्तानबरोबर संबंध ठेवायचे की नाही. पण भारत सरकारकडे हे प्रकरण जाण्यापूर्वी बीसीसीआयने आपली भूमिका स्पष्ट करायला हवी. जर बीसीसीआयला पाकिस्तानबरोबर खेळायचे नसेल तर हा प्रश्न सरकारपर्यंत जाणारही नाही.”

वाचा-

शोएबच्या भारत-पाक सामन्यांवर कपिल देव भडकलेकरोनाशी लढण्याठी जो मदतनिधी लागेल तो आपण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांमधून जमा करू शकतो, असे प्रस्ताव पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने बुधवारी ठेवला होता. या प्रस्तावावर भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव चांगलेच भडकलेले आहे. कपिल यांनी याबाबत शोबला चांगलेच सुनावले आहे.

कपिल म्हणाले की, ” करोनाशी लढण्यासाठी भारताला पैशांची नाही. त्याचबरोबर सध्याची परिस्थिती पाहता क्रिकेट सामने खेळवण्याचा विचारही कोणी करू शकत नाही.”

कपिल पुढे म्हणाले की, ” सध्याच्या घडीला भारताला कोणत्याही मदत निधीची चगरज नाही. सध्याच्या घडीला करोनापासून कसे वाचता आणि वाचवता येईल, हे आमच्यासाठी फार महत्वाचे आहे. भारतामध्ये यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत आणि यंत्रणा दिवस-रात्र त्यासाठी झटत आहे. त्यामुळे अशा कोणत्याही गोष्टीचा भारताला सध्या गरज नाही. त्याचबरोबर सध्याच्या घडीला जे कोणी राजकारण करत आहेत, त्यांनी ते बंद करायला हवे आणि एकत्रितपणे करोनाशी लढा द्यायला हवा.”

करोनाला पळवण्यासाठी बीसीसीआयने केलेल्या मदतीबाबत कपिल म्हणाले की, ” बीसीसीआयने करोनाला पळवण्यासाठी ५१ कोटी रुपयांचे दान दिले आहे. जर देशाला अजून गरज असेल तर नक्कीच अधिक मदत केली जाईल. त्यासाठी मदतनिधी सामना खेळवून जमा करण्याची काहीच गरज नाही. सध्याच्या घडीला देशातील वातावरण चिंताजनक आहे. त्यामुळे या परिस्थितीमधून कसे बाहेर पडता येईल, याचा विचार सर्वप्रथम करायला हवा.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here