पुजारा हा एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे. भारताच्या फक्त कसोटी संघात पुजाराला स्थान देण्यात येते. पण वनडे आणि ट्वेन्टी-२० संघात मात्र पुजाराला स्थान देण्यात येत नाही. सध्याच्या घडीला करोना व्हायरसमुळे बीसीसीआयला काही स्पर्धा रद्द कराव्या लागत आहेत, तर आयपीएलही त्यांनी पुढे ढकललेले आहे. दुसरीकडे करोनाला पळवण्यासाठी त्यांनी ५१ कोटी रुपयांचे दोनही केलेले आहे.
सध्याच्या घडीला पुजारासारखा फलंदाज क्रिकेट विश्वामध्ये दिसत नाही. आपल्या बचावात्मक फलंदाजीने पुजाराने संघात आपले एक स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे पुजाराला बाद करण्यासाठी प्रत्येक फलंदाज आतूर असतो. पण न्यूझीलंडमधील कसोटी मालिकेत पुजाराला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नव्हती.
जेव्हा पुजारा भारताकडून खेळत नसतो तेव्हा तो इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळायला जात असतो. इंग्लंडमधील ग्लुस्टाशायर संघाकडून क्रिकेट खेळतो. यापूर्वी पुजारा डर्बीशायर, यॉर्कशायर, नॉटींघमशायर या संघांकडूनही कौंटी क्रिकेट खेळलेला आहे. करोना व्हायरसचे संकट पाहता इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने मे महिन्यापर्यंत सर्व प्रकारच्या क्रिकेट स्पर्धा रद्द केलेल्या आहेत. त्यामुळे ग्लुस्टाशायरने या वर्षीचा पुजाराचा करार रद्द केलेला आहे. ग्लुस्टाशायरने सहा सामन्यांसाठी पुजाराबरोबर करार केला होता. आता जेव्हा पुन्हा इंग्लंडमध्ये क्रिकेट मोसमाला सुरुवात होईल, तेव्हा कदाचित ग्लुस्टाशायर पुजाराबरोबर करार करू शकते.
ग्लुस्टाशायर क्लबने आपल्या पत्रकामध्ये म्हटले आहे की, ” ग्लुस्टाशायरच्या चाहत्यांना मे २०२० पर्यंत पुजाराला मैदानात पाहण्याचा योग येणार नाही. सध्याच्या घडीला करोना व्हायरसमुळे इंग्लंडमध्ये मे महिन्यापर्यंत क्रिकेट स्पर्धा खेळवण्यात येणर नाही. कदाचित त्यानंतरही काही महिने क्रिकेटच्या मैदानापासून खेळाडूंना लांब रहावे लागेल. त्यामुळे तुर्तास आम्ही हा निर्णय घेतलेला आहे.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times