अमेरिकेत ‘करोना’बाधितांची संख्या पावणेचार लाखांच्या आसपास असून, मृतांची संख्याही १० हजारांहून अधिक झाली आहे. त्यामुळे करोना व्हायरसमुळे अमेरिकेतील स्थिती फार वाईट आहे. त्याचबरोबर या दिग्गज खेळाडूंची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांना भारतामध्ये यायचे आहे.
भारताच्या विश्वविजेत्या हॉकी संघातील अशोक दिवान हे सध्याच्या घडीला लॉकडाऊनमुळे अमेरिकेमध्ये अडकलेले आहेत. त्यांची प्रकृती थोडीशी चिंताजनक आहे. त्यामुळे त्यांनी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांच्याकडे मदत मागितली आहे.
सध्याच्या घडीला भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये लॉकडाऊन आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील विमान सेवा बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अशोक दिवान यांना अमेरिकेतून थेट भारतात यायला जमू शकत नाही. त्यामुळे त्यांनी बात्रा यांना पत्र लिहून मदतीची मागणी केली आहे.
अशोक दिवान यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, मी सध्या अमेरिकेत अडकलो आहे. उच्च रक्तदाबाच्या समस्येमुळे मला कॅलिफोर्नियामधील एका हॉस्पिटलमध्येही दाखल करण्यात आले होते. माझी प्रकृती सध्याच्या घडीला खालावलेली आहे. त्यामुळे मला भारतामध्ये यायचे आहे. माझे परतीचे तिकिटही रद्द झाले आहे. त्याचबरोबर इन्श्युरन्सही नसल्यामुळे येथील खर्च मला परवडत नाही. त्यामुळे मला मदत करावी आणि माझी भारतामध्ये येण्याची सोय करावी.”
सध्याच्या घडीला भारतापेक्षा अमेरिकेतील वातावरण भयावह आहे. गेल्या काही दिवसांत तिथे करोनाबाधित रुग्णांची संख्या कमालीची वाढलेली आहे. त्यामुळे अमेरिकेपेक्षा सध्याच्या घडीला भारत सुरक्षित आहे, असे म्हटले जात आहे. त्यामुळेच अमेरिकेतून मला भारतात आणा, अशी मागणी अशोक दिवान करत असावेत. आता त्यांची ही मागणी भारत सरकारपर्यंत कधी पोहोचते आणि ते भारतात कधी येतात, हे पाहावे लागेल.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times