सध्याच्या घडीला भारतामध्ये करोना व्हायरसमुळे लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनमुळे आयपीएल स्पर्धा ही पुढे ढकलली गेली आहे. सध्याच्या घडडीला बरेच खेळाडू, आयपीएल कधी खेळवणार यावर चर्चा करताना दिसत आहेत. पण यंदाची आयपीएल मात्र होणार नाही, असा खुलासा आयपीएल गर्व्हनिंग कौन्सिलचे माजी अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी केला आहे.

भारतातील लॉकडाऊन हे १४ एप्रिलला संपणार आहे. त्यानंतर १५ एप्रिलला आयपीएलची एक बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये आयपीएल खेळवण्याबाबत चर्चा होणार आहे. पण यंदाचा आयपीएलचा मोसम १५ एप्रिलपासून सुरु होणे अशक्य आहे, असे मत शुक्ला यांनी व्यक्त केले आहे.

याबाबत शुक्ला म्हणाले की, ” सध्याच्या घडीला करोना व्हायरसशी लढणे आणि लोकांचे प्राण वाचवणे ही प्राथमिकता आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला या गोष्टी़वरच जोर द्यायॉला हवा. आता वातावरण हे चिंताग्रस्त आहे. त्यामुळे जेव्हा वातावरण सामान्य होईल, तेव्हा आयपीएलबाबत चर्चा करता येईल. आयपीएल कधी खेळवायची हे बीसीसीआयच्या हातामध्ये असले तरी त्यांना भारत सरकारची त्यासाठी परवानगी घ्यावी लागेल. भारत सरकारच्या परवानगीशिवाय भारतामध्ये आयपीएल होऊ शकत नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला तरी १५ एप्रिलपासून आयपीएल होऊ शकत नाही, असे मला तरी वाटत आहे.”

लॉकडाऊनमध्ये आयपीएलपेक्षा मी जनतेचा विचार करतोयसध्याच्या घडीला भारतामध्ये करोना व्हायरसमुळे लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनमुळे आयपीएल स्पर्धा ही पुढे ढकलली गेली आहे. सध्याच्या घडडीला बरेच खेळाडू, आयपीएल कधी खेळवणार यावर चर्चा करताना दिसत आहे. पण भारताच्या एका खेळाडूने मात्र आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे. सध्याच्या घडीला मी आयपीएलपेक्षा भारतातील जनतेचा विचार करत आहे, असे त्याने सांगितले आहे.

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका खास मुलाखतीमध्ये भारताचा युवा क्रिकेटपटू संजू सॅमसन म्हणाला की, ” सध्याच्या घडीला बरेच जणं आयपीएल पुढे ढकलण्यात आली. आता आयपीएल कधी खेळवणार. आयपीएल कधी खेळवायला हवी, यावर चर्चा करताना दिसत आहेत. पण सध्याच्या घडीला देशातील जनतेची सुरक्षितता ही फार महत्वाची आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला आयपीएलपेक्षा देशातील जनतेच्या स्वास्थाचा विचार आपल्याला करायला हवा. ”

संजू बऱ्याच वर्षांपासून आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यात संजू हा संघाचा एक भाग होता. पण त्याला जास्त संधी मिळाली नाही. त्यामुळे यंदाची आयपीएल ही त्याच्यासाठी महत्वाची समजली जात आहे. पण संजू आयपीएलपेक्षा देशातील लोकांचा जास्त विचार करत असल्याचेच समोर आहे आहे. सध्याच्या घडीला संजू हा आपल्या कुटुंबियांसमवेत वेळ व्यतित करत आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here