Sara Tendulkar News : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) नेहमी चर्चेत असते. ती सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह असते. तिच्या इन्स्टाग्रामवर तर लाखो फॉलोअर्स असून तिच्या फोटोंवर आणि व्हिडीओंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव चाहते करतात. एखाद्या अभिनेत्रीपेक्षा तिचं ग्लॅमर कमी नाही. आता सारानं एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यावरुन ती पुन्हा चर्चेत आली आहे आणि चाहते वेगवेगळे कयास काढू लागले आहेत. 

साराची सोशल मीडियावर नेहमी चर्चा असते. सारा आणि अर्जुन ही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलं. अर्जुन आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळत आहे. मात्र त्याला अजून पदार्पणाची संधी मिळालेली नाही. सारा मुंबईच्या सपोर्टसाठी नेहमी मैदानात दिसते. तिच्यासोबत आई अंजली देखील अनेकदा दिसून आली आहे.  
 
 तिनं नुकताच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्यानंतर त्या व्हिडीओवर सातत्यानं कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे.




या व्हिडीओवरुन साराचं नाव मुंबई इंडियन्सचा फलंदाज  डेवाल्ड ब्रेविसशी जोडलं जात आहे.  सोशल मीडियावर चाहते कशाचा संबंध कशाशी लावतील याचा नेम नाही. तसंच साराच्या या व्हिडीओचा संबंध थेट बेबी एबी अशी ओळख असलेल्या डेवाल्डशी जोडला आहे. एका यूजरनं व्हिडीओ पाहून म्हटलं आहे की,  हा व्हिडीओ पाहून डेवाल्ड ब्रेविस पुन्हा वेडा होईल. व्हिडीओवर एकानं कमेंट केली आहे की, लिटल एबी अर्थात डेवाल्ड ब्रेविसचं खरं मोटिवेशन…  

तर आणखी एका यूजरनं लिहिलं आहे की, म्हणूनच लिटल बेबी ABचं प्रेम तुझ्यावर आलं आहे. अर्थातच, यूजर्सच्या या कमेंट्सला काही अर्थ नसतो मात्र ते आपापल्या परीने अर्थ काढत असतात. साराचं नाव असं कुणाशी जुळण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही साराचं नाव क्रिकेटर शुभमन गिलशी जोडलं गेलं आहे. त्याच्या फोटोंवर साराच्या रिअॅक्शन पाहून चाहत्यांनी त्याही वेळी अंदाज बांधले होतेच.  

 



sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here