नवी दिल्ली: करोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामने खेळवण्याची प्रस्ताव ठेवणाऱ्या माजी क्रिकेटपटू याला कपिल देवच्या पाठोपाठ आणखी एका भारतीय क्रिकेटपटूने सुनावले. दोन्ही देशांच्या दरम्यान क्रिकेट खेळायचे की नाही याचा निर्णय अख्तर नाही तर सरकारचा असल्याचे मदन लाल यांनी सुनावले.

वाचा- चा

शोएब अख्तरने करोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी भारत-पाकिस्तान यांच्यात एक वनडे अथवा टी-२० मालिका खेळण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या सामन्यातून निर्माण होणारा निधी करोनाच्या लढ्यात वापरता येईल असे त्याने म्हटले होते. यावर भारताचा माजी कर्णधार कपिल देव याने शोएबला सुनावले होते. त्यानंतर माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनी देखील शोएबला चार शब्द ऐकवले.

वाचा-

पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायचे की नाही याबाबतचा निर्णय भारत सरकारचा आहे. जोपर्यंत सरकार सांगत नाही तोपर्यंत बीसीसीआय पाक सोबत क्रिकेट खेळणार नाही. शोएबने दिलेला प्रस्ताव भविष्यात देखील उपयोगी पडणार नाही. पुढील काही महिने आपल्याला करोना व्हायरसविरुद्ध लढायचे आहे. त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय घेण्याआधी बाकीच्या गोष्टींचा विचार करावा लागले, असे लाल म्हणाले.

वाचा-

शोएबच्या भारत-पाक सामन्यांवर कपिल देव भडकले
कपिल म्हणाले की, ” करोनाशी लढण्यासाठी भारताला पैशांची नाही. त्याचबरोबर सध्याची परिस्थिती पाहता क्रिकेट सामने खेळवण्याचा विचारही कोणी करू शकत नाही.”

कपिल पुढे म्हणाले की, ” सध्याच्या घडीला भारताला कोणत्याही मदत निधीची गरज नाही. सध्याच्या घडीला करोनापासून कसे वाचता आणि वाचवता येईल, हे आमच्यासाठी फार महत्वाचे आहे. भारतामध्ये यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत आणि यंत्रणा दिवस-रात्र त्यासाठी झटत आहे. त्यामुळे अशा कोणत्याही गोष्टीचा भारताला सध्या गरज नाही. त्याचबरोबर सध्याच्या घडीला जे कोणी राजकारण करत आहेत, त्यांनी ते बंद करायला हवे आणि एकत्रितपणे करोनाशी लढा द्यायला हवा.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here