वाचा-
मी जेव्हा क्रिकेट खेळत होते तेव्हा सचिन पेक्षा दुसरा सर्वोत्तम फलंदाज कोणीच नव्हते. सचिन इतका परफेक्ट होता की त्याला बाद करणे अवघड असायचे. सचिनमध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नव्हता, असे क्लार्कने सांगितले.
वाचा-
बिग स्पोर्ट्स ब्रेकफास्ट या रेडिओ शो मध्ये बोलताना क्लार्क म्हणाला, मी आतापर्यंत जितके फलंदाज पाहिले आहेत. त्यामध्ये सचिनपेक्षा सर्वोत्तम कोणीच नाही. त्याला आऊट करणे अतिशय आवघड असायचे. कारण फलंदाजीत त्याच्याकडे कमकूवत असे काहीच नव्हते. सचिन फलंदाजीला आल्यावर त्याच्याकडून चूक होण्याची वाट पाहण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसायचा.
वाचा-
सध्या जागतिक क्रिकेटमध्ये हा सर्वोत्तम फलंदाज आहे. विराट कसोटी, वनडे आणि टी-२० या तिनही प्रकारात सर्वोत्तम फलंदाज आहे. वनडे आणि टी-२० मध्ये त्याचे विक्रम शानदार आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये देखील तो दबदबा निर्माण करत असल्याचे क्लार्क म्हणाला.
वाचा-
सचिन आणि विराट मध्ये एक गोष्ट समान आहे. या दोघांना शतक झळकावण्यास आवडते, असे त्यांने सांगितले. सचिन हा जगातील एकमेव असा फलंदाज आहे ज्याने २०० कसोटी सामने खेळले आहेत आणि १०० शतकं केली आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times