भारताचे एक दिग्गज खेळाडू अमेरिकेत अडकलेले आहेत. अमेरिकेत करोना व्हायरसमुळे चिंतेचे वातावरण आहे. त्याचबरोबर या दिग्गज खेळाडूंची प्रकृतीही खालावलेली आहे. त्यामुळे आपल्याला भारतात नेण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती त्यांनी काल भारताच्या ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांना केली होती. आता त्यांच्यासाठी भारत सरकार धावून आल्याचे वृत्त आहे. या खेळाडूंना तात्काळ मदत भारत सरकार करून देणार आहे.

अमेरिकेत ‘करोना’बाधितांची संख्या पावणेचार लाखांच्या आसपास असून, मृतांची संख्याही १० हजारांहून अधिक झाली आहे. त्यामुळे करोना व्हायरसमुळे अमेरिकेतील स्थिती फार वाईट आहे. त्याचबरोबर या दिग्गज खेळाडूंची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांना भारतामध्ये यायचे आहे. यासाठी त्यांनी भारताकडे विनंती केली होती.

याबाबत भारताचे क्रीडा मंत्री यांनी एक ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ” दिग्गज हॉकीपटू अशोक दिवान हे अमेरिकेत अडकले आहेत. त्यांची प्रकृती खालावलेली आहे आणि त्यांना मदतीची गरज आहे. याबाबत जेव्हा मला समजले तेव्हा त्यांना तात्काळ मदत कशी देता येईल यावर विचार करण्यात आला. अमेरिकेतील सॅनफ्रान्सिको येथील दुतावासामध्ये आम्ही दिवान यांच्याबाबत कळवले आहे, त्याचबरोबर त्यांची माहितीही दिली आहे. त्यामुळे आता त्यांना तात्काळ वैद्यकीच सेवा पुरवण्यात येणार आहे.”

भारताच्या विश्वविजेत्या हॉकी संघातील अशोक दिवान हे सध्याच्या घडीला लॉकडाऊनमुळे अमेरिकेमध्ये अडकलेले असल्याचे गुरुवारी समजले होते. त्यांची प्रकृती थोडीशी चिंताजनक होती. त्यामुळे त्यांनी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांच्याकडे मदत मागितली होती.

दिवान यांनी बात्रा यांना पत्र लिहून मदतीची मागणी केली होती. अशोक दिवान यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, मी सध्या अमेरिकेत अडकलो आहे. उच्च रक्तदाबाच्या समस्येमुळे मला कॅलिफोर्नियामधील एका हॉस्पिटलमध्येही दाखल करण्यात आले होते. माझी प्रकृती सध्याच्या घडीला खालावलेली आहे. त्यामुळे मला भारतामध्ये यायचे आहे. माझे परतीचे तिकिटही रद्द झाले आहे. त्याचबरोबर इन्श्युरन्सही नसल्यामुळे येथील खर्च मला परवडत नाही. त्यामुळे मला मदत करावी आणि माझी भारतामध्ये येण्याची सोय करावी.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here