सध्याच्या घडीला भारतामध्ये लॉकडाऊन आहे. करोना व्हायरसचा फटका संपूर्ण देशासह भारतालाही बसलेला आहे. त्यामुळे देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. भारतामधील सर्व क्रीडा स्पर्धा रद्द केल्या आहेत. या गोष्टीचा फटका खेळाडूंनाही बसला आहे. पण या लॉकडाऊनमध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी करतोय तरी काय, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल…

सध्याच्या घडीला करोना व्हायरसमुळे आयपीएल पुढे ढकलण्यात आले आहे. १५ एप्रिलला आयपीएलबाबत निर्णय होणार आहे. त्यामुळे आयपीएलच्या संघातील सर्वच खेळाडू आपल्या घरी आहेत. पण धोनी सध्या काय करतोय, हा प्रश्टन सर्वांनाच पडलेला आहे. कारण तो या काळात लोकांपुढे आलेला पाहायला मिळालेला नाही. यंदाचे आयपीएल होणार की नाही, याबाबत बरीच चर्चा सुरु आहे. यंदाच्या आयपीएलवर धोनीचे आंतरराष्ट्री करीअर अवलंबून असल्याचेही म्हटले जात आहे. त्यामुळे धोनीसाठी हा सर्वात कठीण काळ असल्याचे म्हटले जात आहे.

आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्सने सध्या एक धोनीचा फोटो ट्विट केला आहे. यामधून धोनी सध्या नेमके काय करतो आहे, हे तुम्हाला कळू शकेल. चेन्नईने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये धोनी चक्क माळी काम करताना दिसत आहे. आपल्या घरासमोरील मैदानात धोनी उतरला असून तो तेथील गवत कापत असल्याचे या फोटोमध्ये दिसत आहे.

करोना व्हायरसमुळे देशातील परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे १५ एप्रिलपासून आयपीएल सुरु होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेख समजली जात आहे. पण १५ एप्रिलला मात्र आयपीएलची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये जुलै महिन्यात आयपीएल खेळवायची का, यावर विचार केला जाणार आहे.

सध्याच्या घडीला करोना व्हायरसमुळे देशातील वातावरण सामान्य नाही. देशातील वातावरण सामान्य होण्यासाठी जूनपर्यंतचा कालावधी जाऊ शकतो, असे म्हटले जात आहे. जर जून महिन्यात देशातील वातावरण सामान्य झाले तर जुलै महिन्यात आयपीएल खेळवण्यात येऊ शकते. त्यामुळे आता बीसीसीआयचा जुलै महिन्यात आयपीएल खेळवण्याचा विचार करत आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here