नवी दिल्ली: भारताचा माजी सलामीवीर आणि स्फोटक फलंदाज सोशल मीडियावर सक्रीय असतो. सेहवागच्या अनेक पोस्ट व्हायरल देखील होतात. गेल्या काही दिवसात करोना व्हायरसमुळे क्रिकेटपटू घरातून सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी संवाद करत आहेत. सेहवागने देखील करोना व्हायरस संदर्भात काही पोस्ट केल्या होत्या. आता लॉकडाउनच्या काळात त्याची आणखी एक पोस्ट व्हायरल झाली आहे.

वाचा-
सेहवागने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याच्या तीन नियमांबद्दल सांगितले आहे. व्हिडिओ सेहवाग म्हणतो, माझे तीन नियम आहेत. पहिला आवदेन, दुसरा निवेदन आणि त्यानंतर दे दणादण…

वाचा-

त्याच्या या व्हिडिओ पोस्टवर चाहत्यांच्या जबरदस्त प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी त्याची दे दणादण हा नियम आवडल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

वाचा-
सेहवाग नेहमीच त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत राहतो. क्रिकेटच्या मैदानावर मुल्तान के सुल्तान अशी ओळख असलेला सेहवाग सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करतो.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here