वाचा-
भारतीय क्रिकेट संघातील सलामीवीर हिटमॅन रोहित शर्माने मुंबई पोलिसांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत दलातील कर्मचारी रस्त्यावरून संचलन करत जात आहेत. रोहितने हा व्हिडिओ शेअर करत लोकांना पोलिसांसाठी टाळ्या वाजवण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर त्याने पुन्हा एकदा सर्वांना घरी राहण्याची विनंती केली आहे.
वाचा-
देशातील सर्वाधिक करोना रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. तर मुंबईत सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. अशा परिस्थितीत मुंबई पोलीस मोठ्या धाडसाने लोकांसाठी मेहनत घेत आहेत. रोहितने या ट्वीटच्या माध्यमातून पोलिसांना सलाम केला आहे.
वाचा-
वाचा-
करोनाविरुद्धच्या लढ्यात रोहितने याआधी ८० लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. रोहितच्या आधी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्मा यांनी दिल्ली पोलिसांचा एक व्हिडिओ शेअर करत त्यांचे कौतुक केले होते.
देशात करोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आतापर्यंत भारतात ७ हजारहून अधिक रुग्ण सापडले असून त्यापैकी २३९ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात देशात ४० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times