मुंबई: आयपीएलच्या १५व्या हंगामात अनेक नवे खेळाडू समोर येत आहेत. याआधी देखील आयपीएलच्या माध्यमातून अनेक खेळाडू भारतीय संघात आले आहेत. आयपीएल २०२२मध्ये काही खेळाडू असे आहेत ज्यांनी आतापर्यंत कमाल केली आहे. सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा जलद गोलंदाज उमरान मलिक याने आयपीएलचा हा हंगाम गाजवलाय.

वाचा- तळातून दुसऱ्या क्रमांकावर तरी CSK पाहतेय प्ले ऑफचे स्वप्न; जाणून घ्या नवे समीकरण

उमरान मलिक सातत्याने १५० KMPHच्या वेगाने गोलंदाजी करतो. त्यानंतर मलिकने स्वत:चा विक्रम मोडत १५१ आणि नंतर १५३ KMPHच्या वेगाने गोलंदाजी केली. एका आठवड्यापूर्वी मलिकने पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात एका ओव्हरमध्ये चार विकेट घेतल्या, यात एक रनआउटचा समावेश होता. आता काल चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या लढतीत उमरानने १५४ KMPHच्या वेगाने चेंडू टाकला. हा चेंडू आयपीएल २०२२मधील सर्वात वेगवान चेंडू ठरला.

वाचा- रिक्षाचालक बापाचे स्वप्न मुलाने पूर्ण केले; विक्रमासह संघाला फायनलमध्ये पोहोचवले


वाचा- ज्याने विजय मिळवून दिला त्याच्यावरच भडकला धोनी, जाणून घ्या झाले तरी काय

उमरानने टाकलेल्या या सर्वात वेगवान चेंडूवर नेमके काय झाले याची उत्सुकता तुम्हा सर्वांना असेल. चेन्नईचा स्फोटक सलामीवीर ऋतुराज गायकवाडने या वेगवान चेंडूवर चौकार मारला. चेन्नईच्या डावाच्या १०व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर ऋतुराजने ३३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले, त्याने १५४ KMPHच्या चेंडूवर चौकार मारला. उमरानने या सामन्यात कोणतीही विकेट घेतली नाही, पण त्याच्या नावावर हंगामातील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम नोंदवला गेला.

हैदराबादविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत चेन्नईने २ बाद २०२ धावा केल्या. यात ऋतुराज गायकवाडच्या ९९ आणि डेव्हॉन कॉन्वे याच्या ८५ धावांचा समावेश होता. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १८२ धावांची विक्रमी भागिदारी केली. उत्तरादाखल हैदराबादला २० षटकात ६ बाद १८९ धावा करता आल्या.

आयपीएल २०२२मध्ये सर्वात वेगवान चेंडू

उमरान मलिक- १५४
लॉकी फर्ग्युसन- १५३.९
उमरान मलिक- १५३.३
उमरान मलिक- १५३.१
उमरान मलिक- १५२.९

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here