वाचा-
गेल्या अनेक महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर असलेल्या धोनीच्या निवृत्तीबद्दलच्या चर्चा काही केल्या थांबत नाहीत. आयपीएलच्या १३व्या हंगामात चांगली कामगिरी करुन पुन्हा एकदा भारतीय संघात पुनरागमन करण्याची धोनीची योजना होती. पण करोनामुळे आयपीएल होणार की नाही याबद्दल शंका निर्माण झाली आहे. काहींच्या मते धोनीचा सुवर्णकाळ संपला आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी देखील आयपीएलमधून धोनी शिवाय अन्य खेळाडूंना टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात स्थान मिळू शकते, असे वक्तव्य केले होते.
वाचा-
आयपीएल रद्द झाल्यास धोनीचे करिअर संपले अशी चर्चा सुरू आहे. अशातच इंग्लंडचा माजी कर्णधार हुसेन याने मात्र धोनीमध्ये अद्याप क्रिकेट शिल्लक आहे. त्याच्यावर निवृत्तीसाठी दबाव टाकू नका, असे म्हटले आहे.
वाचा-
स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या एका मुलाखतीत धोनीला भारतीय संघात स्थान मिळाले पाहिजे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर हुसेन म्हणाला, धोनी अजूनही भारतीय क्रिकेटमध्ये खुप योगदान देऊ शकतो. एक दोन असे सामने आहेत जेव्हा धावांचा पाठलाग करताना धोनीकडून चूक झाली. यात वर्ल्ड कपमधील इंग्लंडविरुद्धच्या सामन्याचा समावेश आहे. पण एकूणच धोनी हा दर्जेदार खेळाडू आहे.
वाचा-
तुम्ही एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. तो (धोनी) एकदा संघाबाहेर गेला तर त्याला पुन्हा घेऊ शकणार नाही. धोनी सारखा खेळाडू एका पिढीत एकदाच येतो. त्याच्यावर लवकर निवृत्तीसाठी दबाव टाकू नये. धोनीला स्वत:ची मानसिकस्थिती माहीत आहे आणि अंतिम निर्णय निवड समितीला घ्यायचा आहे, असे हुसेन म्हणाला.
वाचा-
काय म्हणाले होते रवी शास्त्री
आयपीएल कधी सुरू होते त्यावर सर्व काही अवलंबून आहे. धोनी कसा खेळतो अन्य खेळाडू कशी कामगिरी करतात यावर सर्व गोष्टी ठरतील. टी-२० वर्ल्ड कपच्या आधी आयपीएल हीच मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेत वर्ल्ड कपसाठीचे १५ खेळाडू निवडले जातील, असे शास्त्री म्हणाले होते.
वाचा-
करोना व्हायरसमुळे आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत स्थगित केली होती. आज पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवला आहे. त्यामुळे आयपीएल रद्द होण्याची शक्यता अधिक आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times