अझरने भारताचा चांगला संघ बांधला होता. अझरच्या नेतृत्वाखाली भारताने काही विजय मिळवले होते. अझरच्या शैलीचे बरेच चाहते दिवाने होते. त्याची फलंदाजी करण्याची आणि खांदे उडवण्याी स्टाईल चांगलीच लोकप्रिय झाली होती.
अझरने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ३० शतके लगावली, पण त्यापैकी १०-१२ त्याला आठवतात. पण यापैकी एक शतक तो कधीही विसरणार नाही. कारण त्या काळात अझरने फक्त ६२ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले होते.
याबाबत अझर म्हणाला की, ” मला अजूनही हा सामना लक्षात आहे. कारण त्यावेळी क्रिकेट जास्त जलद झाले नव्हते. त्यामुळे आक्रमक खेळ त्यावेळी कमी पाहायला मिळायचा. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात मी सहाव्या क्रमांकवर फलंदाजी करायला आलो होते. त्यावेळी अजय शर्मा माझ्याबरोबर होता. अजयने मला चांगली साथ दिली. त्यामुळे मी फटकेबाजी करू शकलो. त्या काळात ६० चेंडूंमध्ये शतक करणे फार अवघड समजले जात होते. पण आक्रमक फलंदाजी करत मी ते पूर्ण केले होते. त्यामुळे हा सामना मी कधीच विसरू शकत नाही.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times