नवी दिल्ली: देशावर आलेले करोना संकट टाळण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढवण्यात आला आहे. यामुळ सर्व व्यवहार ठप्प झाल्याने गरीब लोकांचे विशेषत: हातावर पोट असलेल्या कामगारांचे हाल होत आहेत. अशा लोकांना मदत करण्यासाठी अनेक जण पुढाकार घेत आहेत. भारतीय ए संघातील सलामीवीर आणि पश्चिम बंगाल संघाचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरण याने डेहराडूनमधील गरीब लोकांना मदत केली आहे.

वाचा-
अभिमन्यूने गरीब लोकांसाठी २.५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही मदत त्याने पोलिसांकडे सोपवली. अशा कठीण काळी आपल्याला एकमेकांना मदत केली पाहिजे. डेहराडूनमधील पोलिसांकडे मी २.५ लाख दिले आहेत. जे मजूर अडकले आहेत त्यांना मदत होईल. त्यांच्या अन्न-धान्याची सोय होऊ शकेल, असे अभिमन्यूने म्हटले आहे.

वाचा-
आम्ही १०० हून अधिक लोकांच्या घरी अन्न-धान्य पोहोचवले आहे. ही मदत फार मोठी नाही. पण यामुळे मनाला समाधन मिळाल्याचे तो म्हणाला.

अभिमन्यूच्या नेतृत्वाखाली यावर्षी बंगाल संघ रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. पण फायनलमध्ये त्यांचा सौरष्ट्रकडून पराभव झाला. पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर सौराष्ट्र संघाला विजय मिळाला.

वाचा-
अभिमन्यूने प्रथम श्रेणीतील ६४ सामन्यात १३ शतकांसह ४ हजार ४०१ धावा केल्या आहेत. तर लिस्ट ए सामन्यात ६ शतकांसह २ हजार ६५६ धावा केल्या.

अभिमन्यूच्या आधी भारतीय क्रिकेट संघातील अनेक क्रिकेटपटूंनी केंद्र आणि राज्य सरकारांना मदत केली आहे. तर काही क्रिकेटूंनी गरीब लोकांच्या अन्न-धान्याची सोय केली होती. यात माजी कर्णधार सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना आदींचा समावेश आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here