वाचा-
पोर्तुगालचा मेडीरा येथे नॅशनल स्टेडियमवर सराव करताना आढळला. करोनामुळे फुटबॉलसह सर्व क्रीडा स्पर्धा स्थगित केल्या आहेत. स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी घरीच थांबले आहेत. अशात रोनाल्डोने मात्र नियम मोडला आणि सराव केला. यासंदर्भात स्थानिक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की लॉकडाऊनचा नियम मोडण्याचा रोनाल्डोला कोणताही विशेषाधिकार दिलेला नाही.
वाचा-
करोना व्हायरसमुळे क्रीडा क्षेत्रात शांतता आहे. अनेक देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. सुरुवातीला काही सामने मोकळ्या मैदानात प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात आले. पण कोरनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता. सामने स्थगित करण्यात आले. काही खेळाडूंनी तर स्वत:हून माघार घेतली होती.
वाचा-
अशातच फिफाचा पुरस्कार मिळवणारा रोनाल्डो मैदानात सराव करत असल्याचे दिसला. रोनाल्डो सध्या पोर्तुगालमध्ये त्याच्या घरीच आहे.
वाचा- टू
गोल डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार मेडीराचे आरोग्य सचिव पेड्रो रामोस यांनी, रोनाल्डोला सराव करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा विशेषाधिकार दिलेला नाही. त्याने अन्य नागरिकांच्या प्रमाणे नियमांचे पालन करावे. रोनाल्डो त्याच्या संघातील अन्य खेळाडूंसह मैदानात सराव करताना दिसला.
नागरिकांना घराबाहेर पडण्याची परवानगी आहे. पण त्यांनी गर्दी करू नये. तसेच कोणत्याही सभेचे आयोजन करू नये. घरातून बाहेर पडल्यावर सुरक्षित अंतर ठेवा, असे रामोस यांनी सांगितले. नियम सर्वांसाठी समान आहेत. आपल्या सर्वांना या आपत्तीचा मुकाबला करायचा असल्याचे ते म्हणाले.
पोर्तुगालमध्ये करोनाचे १६ हजार रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४७० जणांचा मृत्यू झाला आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times