नवी दिल्ली: क्रिकेटमधील काही विक्रम हे संबंधित खेळाडूच्या नावावर अनेक वर्ष असतात. तर काही विक्रम हे इतर कोणी मोडले तरी पुन्हा त्यांच्या नावावर होतात. क्रिकेटमधील असाच एक विक्रम जो गेली अनेक वर्षे एकट्याच्या नावावर आहे.

वाचा-
वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारासाठी १२ मार्च ही तारीख खास अशी आहे. याच दिवशी लाराने २००४ साली कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावांचा विक्रम केला होता. जो आजपर्यंत कोणाला मोडता आला नाही. लाराने आजच्या दिवशी इंग्लंडविरुद्ध नाबाद ४०० धावांची खेळी केली होती. कसोटी क्रिकेटमधील एखाद्या फलंदाजाकडून झालेली ही सर्वोच्च खेळी आहे.

वाचा-
कसोटीमधील एका डावात सर्वाधिक धावांची विक्रम लाराच्या नावावर होता. पण ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनने झिम्बाब्वेविरुद्ध ३८० धावा करत लाराचा ३७५चा विक्रम मागे टाकला होता.

वाचा-
इंग्लंडविरुद्धच्या चार सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्याआधीच लाराच्या कर्णधारपदावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात होते. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करत ५ बाद ७५१ धावा केल्या. इंग्लंडचा पहिला डाव २८५ धावांवर संपुष्ठात आला. त्यानंतर इंग्लंडला फॉलोऑन दिला. त्यांनी दुसऱ्या डावात ५ बाद ४२२ धावा केल्या आणि सामना ड्रॉ झाला.

वाचा-

या सामन्यात लराने ७७८ चेंडूत ४३ चौकार आणि ४ षटकार मारले. वेस्ट इंडिजकडून रिडली जॅकब्सने नाबाद १०७ धावा केल्या. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी २६९ धावांची भागिदारी केली होती.

वेस्ट इंडिजच्या या दिग्गज फलंदाजाची तुलना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी केली जात असे. लाराने १३१ कसोटीत ११ हजार ९५३, तर २९९ वनडेत १० हजार ४०५ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय कसोटीत ४०० धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे. याशिवाय त्याने प्रथम श्रेणीत ५०१ धावा केल्या आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here