वाचा-
२०१९ हे वर्ष उत्तराखंड क्रिकेटसाठी मोठे यश देणारे ठरले होते. ऑगस्ट २०१९ मध्ये क्रिकेट असोसिएशन ऑफ उत्तराखंडला बीसीसीआयकडून मान्यता मिळाली होती. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये असोसिएसनचे सचिव महिम हे बिनविरोध उपाध्यक्ष झाले.
वाचा-
महिम यांची बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सीएयूचे सचिवपद रिक्त झाले. सर्वसहमतीने हे पद भरण्याचा विचार होता. पण गटबाजीमुळे शक्य झाले नाही. त्यानंतर सचिवपदासाठी पुन्हा निवडणुका झाल्या आणि त्यात महिम विजयी झाली. महिम यांना बीसीसीआयमधील उपाध्यक्षपद किंवा सीएयूमधील सचिवपद यापैकी एकाची निवड करायची होती. महिम यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे ठरवले.
वाचा-
महिम यांनी बीसीसीआयकडे राजीनामा पाठवला आहे. पण लॉकडाऊनमुळे बीसीसीआयचे कार्यलाय बंद असून त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यावर लॉकडाऊननंतर निर्णय घेतला जाणार आहे.
अशी शांतता असताना IPL विसरून जा- सौरव गांगुली
लॉकडाऊनचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आल्यामुळे आयपीएल लटकले आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयने आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले आहे. यासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत आयपीएलवर विचार देखील केला जाऊ शकत नाही.
एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना गांगुली म्हणाला, सध्या देशात जी परिस्थितीत आहे त्यामध्ये आयपीएल स्पर्धेचे आयोजन होणे अवघड आहे. आम्ही प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवली असून पण आताच काही सांगता येणार नाही. तसे पाहायला गेले तर सांगण्यासारखे काहीच नाही. विमानतळ बंद आहेत, लोक घरी आहेत, ऑफिस बंद आहेत, कोणीही बाहेर जाऊ शकत नाही. अशीच परिस्थितीत मे महिन्याच्या मध्यापर्यंत असेल.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times