देशात करोना व्हायरसमुळे २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. या काळात घरी असलेल्या लोकांसाठी दुरदर्शनवर दाखवले जात आहे. रविवारी रामायणचा भाग झाल्यानंतर भारताच्या क्रिकेटपटूने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
वाचा-
भारताचा स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने त्याच्या फलंदाजीची प्रेरणा रामायणमधील अंगद ही व्यक्तिरेखा असल्याचे सांगितले. रविवारी रामायणमधील भागात बालीचा पुत्र अंगद श्री रामाच्या वतीने संधी करण्यासाठी रावणाकडे जातो. तेव्हा तो पाय जमिनीवर ठेवतो आणि जर कोणी त्याचा पाय हलवून दाखवला तर श्री रामाचा पराभव झाला असे समजावे हे आव्हान देतो. रावणाच्या सभेतील कोणत्याच मंत्र्याला ते शक्य होत नाही.
जेव्हा खुद्द रावण अंगदचे पाय हलवण्यासाठी येतो तेव्हा अंगद पाय बाजूला करतो आणि रावणारा श्री रामाचे पाय धरण्यास सांगतो. तेच तुम्हाला माफ करतील.
वाचा- र…
सेहवागने मालिकेतील याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. क्रिकेटमध्ये फलंदाजीसाठी अंगद हीच आपली प्रेरणा असल्याचे म्हटले आहे. ही पोस्ट करताना तो म्हणतो, मी तुमच्यापासूनच फलंदाजीची प्रेरणा घेतली आहे. तुमचा पाय हलवणे अवघड नाही तर अशक्य आहे. अंगद जी रॉक्स!
सेहवागने देखील क्रिकेटच्या मैदानावर अशीच फलंदाजी केली होती. सेहवाग एकदा मैदानावर थांबला की तो चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत असे. त्याच्या करिअरमध्ये त्याने अनेक मोठ्या खेळी केल्या असून कसोटीत दोन वेळा त्रिशतक करणारा तो एकमेव भारतीय फलंदाज आहे.
सेहवागने १०४ कसोटी, २५१ वनडे सामन्यातून अनुक्रमे ८ हजार ५८९ आणि ८ हजार २७३ धावा केल्या. यात २३ आणि १५ शतकांचा समावेश आहे. वनडेत सेहवागने २१९ ही द्विशतकी तर कसोटीत ३१९ ही त्याची सर्वोच्च खेळी केली आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times