पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने आता थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. मोदी सरकार हे नकारात्मक आहे, असे खळबळजनक वक्तव्य आफ्रिदीने केले आहे.

नेमके घडले तरी कायकरोनाशी लढण्याठी जो मदतनिधी लागेल तो आपण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांमधून जमा करू शकतो, असा प्रस्ताव पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने ठेवला होता. यानंतर शोएबवर भारतातून जोरदार टीका झाली होती. त्यानंतर शोएबने मात्र हा विषय काढला नाही. पण आता मात्र आफ्रिदीने या विषयाला हात घातला आहे. “भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना जोडणारा क्रिकेट हा एक दुवा आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामने खेळवाया हवे,” असे मत आफ्रिदीने व्यक्त केले आहे.

मोदींबाबत आफ्रिदी काय म्हणाला…आफ्रिदीने यावेळी मोदी यांच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. आफ्रिदी म्हणाला की, ” पाकिस्तानला नेहमीच भारताबरोबर खेळायचे असते. पण मोदी सरकारमध्ये प्रचंड नकारात्मकता आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विदेशीय मालिका होत नाहीत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मालिकेबाबत आम्ही नेहमीच सकारात्मक असतो, पण भारत सरकार याबाबत नकारात्मक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच दोन्ही देशांमध्ये मालिका खेळवली जात नाही.”
वाचा-

आफ्रिदीने ‘पाक पॅशन’बरोबर बोलत असताना मोदी सरकारवर चांगलाच भडकलेला दिसला. आफ्रिदी पुढे म्हणाला की, ” क्रिकेटने भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना एकत्र आणले आहे. त्यामुळे शोएब अख्तर जे म्हणाला त्याबाबत मी पूर्णपणे सहमत आहे. मोदी सरकार नकारात्मक असल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने होत नाही. त्यांनी सकारात्मकपणा दाखवायला हवा, तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांचा आनंद क्रिकेट चाहत्यांना घेता येऊ शकतो.”

वाचा-

करोनाचा फटका सर्वांनाच बसलेला आहे. या लढ्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांमधून मिळू शकते. त्यामुळे करोनाशी लढण्यासाठी जो मदत निधी लागेल, तो भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना भरवून मिळवता येऊ शकतो, असे मत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने व्यक्त केले होते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here