वाचा-
आयपीएल रद्द झाल्यास महेंद्र सिंह धोनीला भारतीय संघात घेणे अवघड होईल. त्याच बरोबर त्याला कोणत्या आधारावर संघात स्थान देणार असा सवाल भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने उपस्थित केला.
धोनी आयपीएलच्या माध्यमातून क्रिकेट मैदानावर परतणार होता. पण चीनमधून जगभर पसरलेल्या करोना व्हायरसमुळे जगातील सर्वात श्रीमंत अशी क्रिकेट लीग स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. देशात करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आयपीएलच्या आयोजनावर शंकाच आहे.
वाचा-
गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी क्रिकेट खेळला नाही. या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत धोनीला कोणत्या आधारावर निवडले जाईल असा प्रश्न गंभीरला विचारण्यात आला. त्यावर गंभीर म्हणाला, धोनी गेल्या एक वर्षापासून क्रिकेट खेळला नाही. त्यामुळे त्याची निवड कोणत्या आधारावर करणार? धोनीपेक्षा केएल राहुल हा सर्वात चांगला पर्याय आहे.
यावेळी गंभीरने राहुलचे कौतुक केले. तो संघातील एक उपयुक्त खेळाडू आहे. मी त्याचा खेळ पाहिला आहे. विकेटकीपर म्हणून तो धोनी इतका चांगला नसेल पण जर तुम्ही त्याचा टी-२० मधील कामगिरी पाहिली तर तो तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. अर्थात निवृत्तीसंदर्भातील निर्णय धोनीचा वैयक्तीक असेल, असे गंभीर म्हणाला.
वाचा-
धोनी निवृत्तीसंदर्भात अनेक चर्चा अद्याप सुरू आहेत. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने धोनीने २०१९च्या वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घ्यायला हवी होती, असे मत व्यक्त केले होते. तर इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन याने धोनीवर निवृत्तीसाठी दबाव टाकू नका. त्याच्यात अद्याप क्रिकेट शिल्लक असल्याचे तो म्हणाला होता.
वाचा- टू…
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times