भारतीय क्रिकेट संघातील मधळ्या फळीतील फलंदाज आणि मिस्टर आयपीएल म्हणून लोकप्रिय असलेला सुरेश रैना २३ मार्चला पुन्हा एकदा बाप झाला. सुरेश रैनाची पत्नी प्रियांकाने सोमवारी एका मुलाला जन्म दिला. याआधी त्यांना एक मुलगी आहे. तिचा जन्म २०१६ मध्ये झाला होता. रैनाने मुलीचे नाव ग्रेसिया रैना असे ठेवले होते. पण मुलीचे नाव रियो ठेवण्यामागचे कारण आहे तरी काय…
याबाबत रैना म्हणाली की, ” माझी मुलगी ग्रेसिया ही आता चार वर्षांची आहे. ग्रेसियाला कार्टुन पाहणे फार पसंत आहे. तिच्या एका आवडत्या कार्टुनमध्ये रियो नावाचा एक पक्षी आहे, तो ग्रेसियाला फार आवडतो. त्यानुसार आम्ही मुलाचे नाव रियो ठेवले आहे.”
जगभरात सध्या करोना व्हायरसविरुद्ध लढा सुरू आहे. अशातच रैनाला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. रैना मोठ्या कालावधीपासून क्रिकेटपासून दूर आहे. करोनामुळे सर्व क्रिकट स्पर्धा स्थगित केल्या आहेत. २९ तारखेपासून सुरू होणारी आयपीएल स्पर्धा देखील १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
वाचा-
गेल्या वर्षी रैनाच्या गुढघ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी रैना प्रयत्न करत आहे. आयपीएलमधील कामगिरीच्या आधारावर टी-२० वर्ल्डकपमधील भारतीय संघाची निवड होणार होती. पण आयपीएल होईल की नाही याबद्दल शंका आहे. रैना २०१८ मध्ये भारतीय संघाकडून अखेरचा खेळला होता. त्यानंतर तो गेल्या वर्षी आयपीएल स्पर्धेत खेळला होता. पण गेल्या दोन वर्षां रैनाने भारतासाठी एकही सामना खेळलेला नाही. पण रैनाने अजून आपली निवृत्तीही जाहीर केलेली नाही.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times