ज्या क्रिकेटपटूंनी देशाची आणि क्रिकेटशी प्रतारणा केली आहे, जे क्रिकेटपटू कलंकित आहेत त्यांनी किराणा धान्याचे दुकान उघडावे. या खेळाडूंना पाकिस्तान संघात पुन्हा स्थान देऊ नये, अशी खरमरीत टीका पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रमीझ राजा यांनी केली आहे.

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर हा स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभागी होता. त्यासाठी त्याला तुरुंगाची हवाही खावी लागली. त्याचबरोबर त्याच्यावर पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने बंदीही घातली होती. पण त्याला मंडळाने पुन्हा एकदा संधी देण्याचे ठरवले आणि हीच गोष्ट रमीझ यांना पटलेली नाही.

ते म्हणाले की, ” ज्या खेळाडूंनी क्रिकेट आणि पाकिस्तानचे नुकसान केले आहे त्यांना खेळण्याचा कोणताही अधिकार नाही. या अशा खेळाडूंनी किराणाची दुकाने टाकायला हवी. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने जर खेळाडूंनी सुट दिली तर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. त्यामुळे सध्याच्या घडीला त्यांनी खेळाच्या विकासासाठी कडक निर्णय घ्यायला हवेत. शरजील खानसारख्या खेळाडूला पुन्हा पाकिस्तानच्या संघात घेणे ही योग्य गोष्ट नाही, यामुळे संघाला मोठा धोका पोहोचू शकतो.”

‘करोनाला हरवण्यासाठी भारत-पाक एकत्र यावेत’करोना व्हायरसशी लढा जगभरात सुरु आहे. भारत आणि पाकिस्तान यांचा करोना हा शत्रू आहे. त्यामुळे करोनाला हरवण्यासाठी भारत आणि पाकिस्तानने एकत्र यायला हवे. आपल्यामधील एकजूट आपण दाखवायला हवी, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने व्यक्त केले आहे.

करोनाचा फटका सर्वांनाच बसलेला आहे. या लढ्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांमधून मिळू शकते. त्यामुळे करोनाशी लढण्यासाठी जो मदत निधी लागेल, तो भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना भरवून मिळवता येऊ शकतो, असे मत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने व्यक्त केले होते. या गोष्टीचे समर्थन आफ्रिदीने केले आहे.

याबाबत आफ्रिदी म्हणाला की, ” सध्याच्या घडीला जर मदतनिधी हवा असेल तर त्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेटचे सामने खेळवण्यास विरोध कशाला असायला हवा. दोन्ही देशांना क्रिकेटने जवळ आणले आहे. त्यामुळे जेव्हा शोएबच्या प्रस्तावाला भारताचे माजी कर्णधार कपिल देव आणि राजीव शुक्ला यांनी विरोध केला तेव्हा मला त्यांचे आश्चर्य वाटले. सध्याच्या घडीला शोएब जे काही म्हणाला ते चु़कीचे नाही आणि ते समजून घेण्याची गरज आहे.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here