वाचा-
चीनमधून संपूर्ण जगभर पसरलेल्या करोना व्हायरसपासून बचावासाठी सोशल डिस्टन्सिंग फार महत्त्वाचे आहे. बोल्टने याचे महत्त्व सांगण्यासाठी त्याचा मैदानावरील एक ऐतिहासिक फोटो शेअर केला आहे. बोल्टने सोमवारी २००८ च्या बिजिंग ऑलिम्पिकमधील १०० मीटर धावण्याच्या अंतिम फेरीतील विक्रमी विजयाचा फोटो शेअर केला आहे. यावेळी बोल्टने इस्टरच्या शुभेच्छा दिल्या.
वाचा-
बोल्टने २००८ च्या बिजिंग ऑलिम्पिकमध्ये बर्ड नेस्ट स्टेडियमवर पुरुषांच्या १०० मीटर अंतर ९.६९ सेकंदामध्ये पार करत नवा वर्ल्ड आणि ऑलिम्पिक रेकॉर्ड केले होते.
१०० मीटरच्या फायनलमध्ये जमैकाचा बोल्ट अमेरिकेचा धावपटू रिचर्ड थॉम्पसनपेक्षा ०.२० सेकंदाने पुढे होता. तेव्हा रिचर्डने दुसरा क्रमांक पटकावला होता.
वाचा-
३३ वर्षीय बोल्टने हा फोटो शेअर करत लोकांनी या कठीण वेळी एकमेकांपासून योग्य अंतर राखण्यास सांगितले आहे. २००८ मध्ये बोल्टने २०० मीटरमध्ये देखील विजय मिळवला होता. बोल्टने त्याच्या करिअरमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत ११ सुवर्ण तर ऑलिम्पिक स्पर्धेत ८ सुवर्णपदके जिंकली आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times