वाचा-
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेट सामने खेळवायला हवेत, या प्रस्तावावरून शोएब भारतात चांगलाच ट्रोल झाला होता. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेट सामने होणार नाहीत, हे शोएबला समजले. त्यामुळे आता त्याने उलट्या बोंबा मारायला सुरुवात केली आहे.
शोएब म्हणतो की, ” करोना व्हायरसमुळे सध्याच्यी परिस्थिती बिकट आहे. या चिंताजनक परिस्थितीमध्ये क्रिकेट होऊ शकत नाही. ऑस्ट्रेलियामध्ये होणारा ट्वेन्टी-२० विश्वचषक रद्द करावा लागू शकतो. त्याचबरोबर आगामी वर्षभरात क्रिकेटची कोणतीही स्पर्धा होईल, असे वाटत नाही.”
वाचा-
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेबद्दलही शोएबने आपले मत व्यक्त केले आहे. तो म्हणाला की, ” न्यूझीलंडच्या दौऱ्यावर भारताला चांगली कामगिरी करता आली नाही. भारतान दोन्ही मालिकेत लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. पण भारतीय संघ काही दिवसांमध्येच ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ त्यांना कडवी झुंज देईल, असे मला वाटते.
करोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामने आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला होता. अख्तरच्या या प्रस्तावावर भारताचे माजी कर्णधार
यांनी अशा प्रकारच्या सामन्याची गरज नसल्याचे सांगितले होते. कपील यांच्या या प्रतिक्रियेवर आणि शोएब अख्तरच्या समर्थनासाठी शाहिद आफ्रिदी मैदानात उतरला आहे.
वाचा-
करोना व्हायरसच्या लढ्यात जी आर्थिक मदत लागेल ती भारत पाकिस्तान सामन्यातून जमा करता येईल, असा प्रस्ताव अख्तरचा होता. हा प्रस्ताव कपिल देव आणि राजीव शुक्ला यांनी फेटाळून लावला होता. अख्तरच्या प्रस्तावाचे समर्थन करताना आफ्रिदीने कपिल देव यांच्या प्रतिक्रियेमुळे निराश झाल्याचे म्हटले.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times