Kapil Dev: भारताचा माजी कर्णधार कपिल देव राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे. तसेच ते पुढच्या आठवड्यात आप आदमी पक्षाकडून (AAP) राजकारणात प्रवेश करण्यात असल्याचंही बोललं जातं होतं. यावर कपिल देव यांनी स्वत: प्रतिक्रिया दिली आहे. तसेच  राजकारणात येण्याचं त्यांनी वृत्त फेटाळून लावलं आहे. खोट्या बातम्या पसरवणाऱ्या लोकांमुळे ते निराश झाले आहेत. कपिल देव यांच्या अनेक सहकारी क्रिकेटपटूंनी राजकारणात प्रवेश केला आहे. 

कपिल देव यांची इंस्टाग्राम स्टोरी
कपिल देव यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केली आहे की, “मला नुकतीच एका राजकीय पक्षात सामील झाल्याची बातमी मिळाली आहे. ही बातमी तथ्थहीन आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. लोकांनी खोटे सांगितल्यानं मी खूप निराश झालो आहे. जेव्हा मला कधी राजकारणात प्रवेश करायचा असेल, तेव्हा मी जाहीरपणे करेल”, असं त्यांनी आपल्या स्टोरीमध्ये लिहलं आहे. 

कपिल देव आणि अरविंद केजरीवाल यांच्या भेटीचा फोटो प्रचंड व्हायरल
दिग्गज अष्टपैलू खेळाडू कपिल देव आम आदमी पार्टीसोबत हातमिळवणी करणार असल्याच्या अनेक बातम्या प्रसारमाध्यमांत झळकत होत्या. यापूर्वी कपिल देव आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भेटीचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. क्रिकेटपटूंचं राजकारणात येणं ही आपल्या देशात नवीन गोष्ट नाही. या वर्षाच्या सुरुवातीला भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग पंजाबमधील आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. 

हे देखील वाचा- 

sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here