भारताची टेनिस सम्राज्ञी सानिया मिर्झा ही सध्या लॉकडाऊनमुळे घरीच आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये तिला टेनिस कोर्टवर उतरता आलेले नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला सानिया टेनिस कोर्टवर उतरण्यासाठी आतूर आहे. सानियाने याबाबतचे एक ट्विटही पोस्ट केले आहे. या ट्विटमध्ये सानिया ही टेनिस बॉल्सबरोबर बसलेली आहे. या ट्विटमध्ये तिने लिहिले आहे की, ”मी सध्याच्या घडीला टेनिस कोर्टवर उतरण्यासाठी आतूर आहे.”
करोनाविरुद्धच्या लढाईत क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक जण स्वत:चे योगदान देत आहे. भारतात करोना रुग्ण आढळल्यानंतर केंद्राने सर्वांना घरी राहण्याचे आवाहन केले होते. तेव्हा सर्व खेळडू सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना घरी राहण्याचे आणि सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करण्यास सांगत होते. त्यानंतर करोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारला आर्थिक स्वरुपात मदत करण्यास सुरूवात केली. भारताच्या स्टार टेनिसपटूने करोनाविरुद्धच्या लढाईत १ कोटी २५ लाख रुपयांची मदत गोळा केली आहे.
वाचा-
करोना व्हायरसविरुद्ध संपूर्ण देश एकजूट होऊन लढत आहे. भारतीय क्रीडा क्षेत्रातील खेळाडू देखील यात मागे नाहीत. कोणी त्यांचा पगार तर कोणी काही लाखांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारांना मदत देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले होते. यासाठी पीएम केअर्स फंड तयार करण्यात आला आहे.
वाचा-
भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने करोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी १.२५ कोटी रुपये जमा केले आहेत. करोना लॉकडाऊनमुळे रोजगार गेलेल्यांसाठी गेल्या आठवड्यात आम्ही काही मदत केली होती. काही हजार कुटुंबांना आम्ही मदत केली. आता या आठवड्यात १.२५ कोटी रुपये जमा केले आहेत. यामुळे एक लाख लोकांना मदत होईल. आपल्याला एकत्रपणे हा प्रयत्न करायचा आहे, असे सानियाने म्हटले आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times