भारताचा आणि महाराष्ट्राचा कबड्डीपटू काशिलिंग आडकेला जुगार आणि दारुचा अड्डा चालवल्याप्रकरणी सांगलीतील कासेगाव पोलिसांनी अटक केल्याचे समजते. यावेळी त्याच्यासह एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आणि एक लाख ६१ हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला.

काशिलिंग हा प्रो कबड्डी लीगच्या दुसऱ्या सत्रामध्ये काशिलिंगने सर्वोत्तम चढाईपटू हा पुरस्कार पटकावला होता. त्यानंतर त्याला लीगमध्ये चांगली मागणी होती. पण कालांतराने त्याचा खेळ अपेक्षेनुसार उंचावला नाही. त्यामुळे गेल्या मोसमात काशिलिंगला कोणत्याही संघाने स्थान दिले नव्हते. त्याचबरोबर त्याची पेट्रोलियम कंपनीमधील नोकरीही सुटली. त्यानंतर काशिलिंग हा दारू आणि पत्त्यांच्या व्यसनामध्ये अडकला.

काशिलिंगच्या केसगाव येथील घरामध्ये दारूचा अड्डा सुरु होता. त्याचबरोबर तिथे जुगारही खेळला जात होता. ही माहिती कासेगाव पोलिसांना मिळाली आणि त्यांनी काशिलिंगच्या घरावर धाड टाकली. पोलिस दिसताच काही जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा हा प्रयत्न व्यर्थ ठरला. यावेळी काशिलिंगसह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर विदेशी दारू, जुगाराचे साहित्य, मोटारसायकल आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल कासेगाव पोलिसांनी जप्त केला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here