मुंबई: काही खेळाडूंच्या नावावर अजब अशा विक्रमांची नोंद होते. क्रिकेटमध्ये असाच एक फलंदाज आहे ज्याने राष्ट्रीय संघाकडून सलामीवीर म्हणून खेळला पण वनडे करिअरमध्ये त्याला एकही षटकार मारता आला नाही. इतक नव्हे तर जो स्विंग गोलंदाजीसाठी प्रसिद्ध होता त्याला जलद गोलंदाजी करावी लागली. जाणून घेऊयात भारताच्या या खेळाडूबद्दल…

वाचा-
आयसीसी वर्ल्ड कप १९९६ भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना. या स्पर्धेत धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या सनथ जयसूर्याने भारताच्या एका गोलंदाजाची अशी धुलाई केली ती त्या गोलंदाजाने स्विंग गोलंदाजी सोडून स्पिन गोलंदाजी करण्यास सुरूवात केली. त्या भारतीय गोलंदाजाचे नाव होते .

वाचा-
गाझियाबादमध्ये १५ एप्रिल १९६३ रोजी जन्मलेल्या मनोज प्रभाकर यांनी भारताकडून ३९ कसोटी आणि १३० वनडे सामने खेळले. तर प्रथम श्रेणीमध्ये त्यांनी १५४ सामने खेळले. ८ एप्रिल १९८४ रोजी प्रभाकर यांनी शारजाह येथे श्रीलंकेविरुद्ध वनडेत पदार्पण केले. मनोज प्रभाकर यांच्याकडे एक उत्तम क्रिकेटपटू म्हणून पाहिले जात होते. भारतीय संघाकडून ते सलामीवीर म्हणून फलंदाजीला येत नंतर त्यांनी गोलंदाजीची जबाबदारी सांभाळली. भारताकडून ३९ कसोटी पैकी २१ कसोटी सामन्यात त्यांनी प्रथम ओपन गोलंदाज आणि ओपनर फलंदाज म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

भारताकडून १३० वनडे खेळणाऱ्या मनोज प्रभाकर यांना त्यांच्या करिअरमध्ये एकही षटकार मारता आला नाही. तर ६८ कसोटी डावात त्यांनी फक्त ४ षटकार मारले.

वाचा-
मनोज प्रभाकर यांनी अनेक मोठ्या क्रिकेटपटूंवर मॅच फिक्सिंगचे आरोप लावले. त्यांनी तहलका मासिकासोबत काही भारतीय खेळाडूंचे स्टिंग ऑपरेशन केले. त्यांनी १९८३ वर्ल्ड कप विजेते कर्णधार कपिल देव, रवी शास्त्री, सुनील गावस्कर, किरण मोरे आणि नवज्योत सिंग सिद्धू या खेळाडूंचे स्टिंग ऑपरेशन त्यांनी केले होते. पण एका प्रकरणात ते स्वत: अडकले. वेस्ट इंडिजविरुद्ध मॅच फिक्सिंग करण्यात त्याचा सहभाग असल्याचे आढळले. त्यानंतर बीसीसीआयने २००० मध्ये त्यांच्यावर बंदी घातली. सहा वर्षानंतर ही बंदी उठवण्यात आली.

प्रभाकर यांनी ९०च्या दशकात अभिनेत्री फरहीन सोबत गुपचुप विवाह केला. १९९६ मध्ये प्रभाकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली पण त्यांना यश आले नाही. ३९ कसोटीत त्यांनी ९ अर्धशतकांसह १ हजार ६०० धावा तर ९६ विकेट घेतल्या आहेत. १३० वनडेत त्यांनी १ हजार ८५८ धावा आणि १५७ विकेट घेतल्या. वनडेत त्यांनी २ शतके आणि ११ अर्धशतके केली आहेत.

वाचा-
९६च्या वर्ल्ड कप स्पर्धेत प्रभाकर यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. लंकेविरुद्धच्या सामन्यात जयसूर्याने त्यांची इतकी धुलाई केली की पुढील सामन्यात त्यांना संधी मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी अचानक क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here