या व्हिडीओमध्ये भारतीय संघ सेलिब्रेशन करताना दिसत आहे. या व्हीडिओमध्ये सचिनने पहिल्यांदा शॅम्पेन उघडल्याचे पाहायला मिळत आहे. सचिननंतर भारताचा माजी तंत्रशुद्ध फलंदाज राहुल द्रविडनेही शॅम्पेन उघडून आपला आनंद साजरा केला. त्यानंतर सचिनच्या बाजूला गांगुली आआला आणि त्यानेही शॅम्पेन उघडल्याचे पाहायला मिळाले.
नेमकं घडलं तरी काय…ही गोष्ट आहे २००१ सालची. यावेळी ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाने पहिला कसोटी सामना जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव वॉ याने शतक झळकावत ४४५ धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला आणि भारताचा पहिला डाव १७१ धावांमध्ये आटोपला होता. त्यावेळी भारतीय संघ २७४ धावांनी पिछाडीवर होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने भारतावर फॉलोऑन लादला होता. सामन्याच्या दुसऱ्या डावात जेव्हा व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड खेळत होते तेव्हा भारताची ४ बाद २३२ अशी अवस्था होती. हा दिवस त्यांनी खेळून काढला होता.
व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांनी दुसऱ्या डावात दमदार फलंदाजी केली लक्ष्मणने यावेळी २८१ धावांची अतुलनीय खेळी साकारली, तर द्रविडने १८० धावा केल्या. या दोघांच्या झुंजार फलंदाजीच्या जोरावर भारताने आपला दुसरा डाव ६५७ धावांवर घोषित केला आणि ऑस्ट्रेलियापुढे ३८४ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे कंबरडे फिरकीपटू हरभजन सिंग आणि सचिन यांनी मोडले. हरभजनने या डावात सहा विकेट्स मिळवल्या, तर सचिनने तीन बळी मिळवत त्याचा चांगली साथ दिली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २१२ धावांवर संपुष्टात आला आणि भारताने १७१ धावांनी हा सामना जिंकला. फॉलोऑन पचवून विजय मिळवणारा भारत हा फक्त तिसरा देश ठरला होता. त्यामुळे या सामन्याच्या विजयानंतर भारतीय संघाने जोरदार सेलिब्रेशन केले होते.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times