एकवेळ तुमच्या लाहोरमध्ये बर्फ पडेल, पण भारत आणि पाकिस्तान मालिका होऊ शकत नाही, असे स्पष्ट मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी मांडले होते. गावस्कर यांच्या या वक्तव्यावर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पलटवार केला आहे.

करोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामने आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावावर भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्यानंतर गावस्कर यांनी कडाडून टीका केली होती.

रमीझ राजा यांनी आपल्या युट्यूब चॅनेलवर सुनील गावस्कर यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये रमीझ यांनी गावस्कर यांना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विदेशीय मालिकेबद्दलही विचारले होते. यावर गावस्कर म्हणाले की, ” सध्याच्या घडीला तरी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेट मालिका होऊ शकते, असे मला तरी वाटत नाही. ही गोष्ट जवळपास अशक्य आहे. पण आयसीसीची एखादी स्पर्धा असेल तर त्यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होऊ शकतो. पण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विदेशीय मालिका सध्या तरी शक्य नाही.”

यावर आता शोएबने पलटवार केला आहे. शोएब म्हणाला की, ” सनी भाई, गेल्यावर्षी लाहोरमध्ये बर्फ पडला होता. त्यामुळे अशक्य असे काहीच नाही.”

अख्तरच्या मदतनिधीसाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामने खेळवावेत या प्रस्तावावर भारताचे माजी कर्णधार
यांनी अशा प्रकारच्या सामन्याची गरज नसल्याचे सांगितले होते. कपील यांच्या या प्रतिक्रियेवर आणि शोएब अख्तरच्या समर्थनासाठी शाहिद आफ्रिदी मैदानात उतरला आहे.

वाचा-
करोना व्हायरसच्या लढ्यात जी आर्थिक मदत लागेल ती भारत पाकिस्तान सामन्यातून जमा करता येईल, असा प्रस्ताव अख्तरचा होता. हा प्रस्ताव कपिल देव आणि राजीव शुक्ला यांनी फेटाळून लावला होता. अख्तरच्या प्रस्तावाचे समर्थन करताना आफ्रिदीने कपिल देव यांच्या प्रतिक्रियेमुळे निराश झाल्याचे म्हटले.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here