विश्वचषक खेळण्यासाठी प्रत्येक संघाची योग्यती पात्रता असावी लागले. विश्वचषकापूर्वी पात्रता स्पर्धा घेतल्या जातात आणि यामधून विश्वचषकासाठी कोणते संघ पात्र ठरले आहेत, हे ठरवले जाते. सध्याच्या घडीला भारतीय क्रिकेट संघ हा विश्वचषकासाठी पात्र ठरल्याचे वृत्त आले आहे.
महिलांचा क्रिकेट विश्वचषक हा पुढील वर्षी म्हणजेच २०२१ साली होणार आहे. या विश्वचषकात भारताला पात्र ठरण्यासाठी पाकिस्तानशी सामना करावा लागणार होता. पण हा सामना रद्द करण्यात आला आणि भारताला अव्वल चार संघांमध्ये स्थान मिळाले. हा सामना रद्द झाल्यामुळे भारतीय संघ आगामी महिला विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. भारतीय चाहत्यांची निराशा झाली. ऑस्ट्रेलियाने भारतीय महिलांचा विजयाचा वारू रोखला. विश्वकरंडकाला पाचव्यांदा गवसणी घातली.
सुरुवातीला धमाकेदार कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाची अंतिम सामन्यातील कामगिरी जेमतेमच होती. तुलनेत ऑस्ट्रेलिया संघ आत्मविश्वासाने खेळत होता. पराभवाचे शल्य भारतीय क्रिकेटपटूंच्या अश्रूंनी व्यक्त केले. सचिन तेंडुलकर यासारख्या दिग्गजाने या संघाला हिंमत देण्याचा प्रयत्न केला. महिलादिनी देशवासीयांना विजयाची भेट देण्याचे स्वप्न भंगले असले तरी, भारतीय महिलांनी पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारून महिला क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. या संघाने भारतीय संघात स्थान मिळवू इच्छिणाऱ्या कित्येक महिला क्रिकेटपटूंची उमेद जागविली आहे. भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीची; जय-पराजयाची कारणमीमांसा पुढे होत राहील. संघाला मिळणाऱ्या सोयीसुविधांची आणि पुरुष संघाच्या बरोबरीचा संघ समजण्याची समज यानिमित्ताने निर्माण होईल की कसे याचाही यानुषंगाने विचार व्हायला हवा. कारण याबाबत आपण कायम कुचराई केली आहे. महिला खेळाडूंनी ही खंत बोलून दाखविली आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times