वाचा- व्यक्ती
इंडियन महिला लीगचा पुरस्कार मिळवणारी गोकुलम केरळ एफसी फुटबॉल संघाची महिला कोस प्रिया पीव्ही करोना लढ्यात योगदान देत आहे. करोना व्हायरसमुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये गरजू लोकांना औषध आणि जेवण देणाऱ्या एका हेल्पलाइन केंद्रात प्रिया काम करत आहे.
प्रिया केरळमधील कन्नूर येथे एका हेल्पलाइन केंद्रात कम करत आहे. या केंद्रात प्रिया सोबत भारत आणि जमशेदपूर एफसीची फुटबॉलपटू सीके विनीत देखील काम करत आहे. या केंद्रात काम करणे आव्हानात्मक आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक फोन कॉलवरील व्यक्तीला त्याच्या गरजांची पूर्तता करावी लागते.
वाचा-
भारताच्या १९ वर्षाखालील संघाची प्रशिक्षक असलेली प्रियाने सांगितले की आम्हाला रोज १५० ते २०० फोन येतात. यातील अधिकतर फोन हे औषधासाठी असतात. या लोकांना त्यांच्या गरजेनुसार औषधे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी असते. त्यामुळे जीवनावश्यक गोष्टी सर्वांपर्यंत पोहोचतील याची काळजी घ्यावी लागते.
वाचा-
औषधासंदर्भात आलेली विनंती फेटाळून लावता येत नाही. अन्न-धान्य संदर्भात देखील आम्हाला अशी काळजी घ्यावी लागते. या गोष्टी सर्वांपर्यंत पोहोचल्या पाहिजे याची काळजी घ्यावी लागते, असे प्रिया म्हणाली.
या हेल्पलाइनच्या माध्यमातून विद्यार्थी आणि अन्य लोकांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times