मेलबर्न: करोना व्हायरसमुळे जगभरातील सर्व क्रीडा स्पर्धा स्थगित केल्या आहेत. तर काही स्पर्धा या रद्द कराव्या लागल्या आहेत. यामध्ये ऑलिम्पिक सारख्या सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेचा समावेश आहे. भारतात बीसीसीआयने देखील IPL स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहे. अशा परिस्थितीत पुढील काही महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या स्पर्धेवर करोना संकट आले आहे. हा वर्ल्ड कप कोणत्याही परिस्थिती झाला पाहिजे, असे मत एका क्रिकेटपटून व्यक्त केले.

वाचा-
करोना व्हायरसच्या धोक्यामुळे अनेक देशात लॉकडाऊन आहे. याचा परिणाम क्रिकेटवर देखील झाला आहे. करोनाचा प्रभाव किती दिवस राहील हे आताच सांगता येत नाही. कदाचीत टी-२० वर्ल्ड कप देखील स्थगित करावा लागू शकतो. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉगने टी-२० वर्ल्ड कपच्या आयोजनासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करावेत. यासाठी खेळाडूंना एक महिना आधीच चार्टर्ड विमानाने आणावे आणि सर्वांची करोना चाचणी घ्यावी, असे हॉगने म्हटले आहे.

वाचा-
ऑस्ट्रेलियात येत्या १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या काळात आयसीसी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. हॉग ही स्पर्धा स्थगित अथवा रद्द करण्याच्या विरोधात आहे. यासाठी आयोजकांनी आतापासून आवश्यक ती पावले उचलली पाहिजेत, असे तो म्हणाला.

अशी चर्चा सुरू झाली आहे की, ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० वर्ल्ड कप रद्द होऊ शकतो किंवा त्याची तारीख बदलू शकते. ही गोष्ट मला आवडलेली नाही. काही अडचणी आहेत पण ज्यातून आपल्याला मार्ग काढावा लागले, असे हॉगने ट्विटरवर म्हटले आहे.

अनेक खेळाडू लॉकडाऊनमुळे घरीच आहेत. त्यामुळे त्यांना टी-२० वर्ल्ड कपची तयारी आणि सरावासाठी वेळ नाही मिळाला. यासाठी त्यांना एक महिना आधीच ऑस्ट्रेलियात आणावे लागले, असा हॉग विचार आहे.

सध्या विमान सेवा बंद आहे. अशा परिस्थितीत खेळाडूंना चार्टर्ड विमानाने आणावे. त्याआधी त्यांची करोना टेस्ट घेतली जावी. ऑस्ट्रेलिया आल्यानंतर देखील दोन आठवडे सर्वांना लॉकडाऊनमध्ये ठेवले जावे. त्यानंतर पुन्हा एकदा करोना चाचणी घेऊन ती नेगेटिव्ह आल्यावर सराव सुरू केला जावा, असे हॉगचे म्हणणे आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here