मुंबई: करोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत केंद्र आणि राज्य सरकारांना अनेक जण मदत करत आहेत. यामध्ये उद्योजक, सिनेस्टार आणि क्रिकेटपटूंचा समावेश आहे. करोनामुळे यावर्षी IPL स्पर्धा होईल की नाही याबद्दल शंका आहे. आता आयपीएलमधील एका संघाने करोना लढ्यात मोठी रक्कम दिली आहे. इतक नव्हे तर या संघाची मालकी असलेल्या कंपनीने देखील मोठी रक्कम दान केली.

वाचा-
आयपीएलमध्ये महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली संघाने तामिळनाडूच्या मुख्यमंत्री मदत निधीसाठी १ कोटी रुपयांची मदत केली आहे. तर चेन्नई संघाचे मालक असलेल्या इंडिया सिमेंट्सने ५० लाख दिले आहेत. विशेष म्हणजे ही मदत केल्याचे सार्वजनिक सांगण्यात आले नाही. चेन्नई संघाच्या एका चाहत्याने याचा खुलासा केला. संबंधित चाहत्याने यासंदर्भातील कॉपी सार्वजनिक केली.

वाचा-

तामिळनाडूचे मुख्यमंत्री के पलानीस्वामी यांनी राज्यातील मोठे उद्योगपती आणि बड्या लोकांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर इंडिया सीमेंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाने मोठी रक्कम दान केली. याआधी सनरायझर्स हैदराबादने अशा प्रकारची मदत केली होती.

वाचा-
देशात गुरुवारी सकाळपर्यंत करोनाचे १० हजार ४७७ रुग्ण आढळले होते. आतापर्यंत यामुळे ४१४ जणांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूत करोनाचे १ हजार २४२ रुग्ण तर १४ जणांचा मृत्यू झालाय.

वाचा-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवल्याचे जाहीर केले. त्यानंतर बीसीसीआयने आयपीएलचा १३वा हंगाम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला. आयपीएलचा १३वा हंगाम स्थगित केला जात आहे रद्द नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. आम्हाला आशा आहे की या वर्षाच्या अखेरीस होऊ शकेल. यासाठी मार्ग निघेल अशी आशा आहे, असे एका संघाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here