दोहा: करोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. सर्व प्रकारचे व्यवहार ठप्प झाले असून क्रीडा क्षेत्र देखील त्यापासून वाचले नाही. याआधी क्रीडा क्षेत्रातील काही प्रशिक्षक, मॅनेजर आणि माजी खेळाडूंचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला होता. आता क्रीडा क्षेत्राला आणखी एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे.

वाचा-
करोनामुळे सर्व खेळातील स्पर्धा स्थगित किंवा रद्द केल्या आहेत. पण या व्हायरसने कतार फुटबॉल वर्ल्ड कपच्या नियोजनात अडथळा आणला आहे. २०२२ मध्ये होणाऱ्या या वर्ल्ड कपची तयारी करणाऱ्या सात कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. या कर्मचाऱ्यांची चाचणी घेण्यात आली होती आणि ती पॉझिटिव्ह आली.

वाचा-
संबंधित सात कर्मचारी तीन वेगवेगळ्या स्टेडियममध्ये काम करत होते. फुटबॉल वर्ल्ड कप संदर्भात करोनाची ही पहिली घटना आहे. वर्ल्ड कपची तयारी करणाऱ्या आयोजकांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कतारमध्ये आतापर्यंत करोनाचे ३ हजार ७११ रुग्ण आढळले आहेत.

वाचा-
ज्या कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे त्यापैकी दोघे अल थुमामा स्टेडियम येथे काम कर होते. तर तीन कर्मचारी अल रेयान आणि अल बायट स्टेडियम येथे काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे.

कतारमध्ये २०२२ साली होणाऱ्या फिफा वर्ल्ड कपसाठी सात नवे स्टेडियमची निर्मिती सुरू आहे. यातील एक स्टेडियम पूर्ण तयार झाले आहे. बुधवारी आखाती देशांमध्ये करोनाचे ३ हजार ७११ रुग्ण आढळले होते तर ७ जणांचा मृत्यू झाला होता.

वाचा-

भारतात गुरुवारी सकाळपर्यंत करोनाचे १० हजार ४७७ रुग्ण आढळले होते. आतापर्यंत यामुळे ४१४ जणांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूत करोनाचे १ हजार २४२ रुग्ण तर १४ जणांचा मृत्यू झालाय.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here