करोना व्हायरसमुळे क्रीडा टजगतासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. करोना व्हायरसमुळे एका स्टार खेळाडूच्या आईचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. एका महिन्यापासून त्या करोना व्हायरसशी झुंज देत होत्या, अखेर त्यांची प्राणज्योत आज मालवली.

करोना व्हायरसचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. करोना व्हायरसमुळे बऱ्याच क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत तर काही पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. सध्याच्या घडीला सर्वच खेळाडू आपल्या घरी आहेत. पण या स्टार खेळाडूवर आई गमावल्यामुळे दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनचा स्टार खेळाडू कार्ल अँथोनी टाऊन्सची आई जॅकलिन यांचे करोना व्हायरसमुळे आज निधन झाले आहेत. महिन्याभरापूर्वी त्यांनी करोना व्हायरसची लागण झाली होती. त्यानंतर २५ मार्चपासून त्या कोमामध्ये गेल्या होत्या. पण आज अखेर त्यांचे निधन झाल्याचे वृत्त आले आहे.

याबाबत टाऊन्स कुटुंबियांनी सांगितले की, ” करोना व्हायरसशी जॅकलिन या एका महिन्यापासून झुंज देत होत्या, पण आज अखेर त्यांचे निधन झाले आहे. ”

नॅशनल बास्केटबॉल असोसिएशननेही जॅकलिन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनने आपल्या पत्रकात म्हटले आहे की, “करोना व्हायरसमुळे कार्लच्या आईचे निधान झाले आहे, त्याच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या कठिण प्रसंगातून जाण्यासाठी इश्वर त्यांना शक्ती देवो, हीच आमची प्रार्थना आहे.”

करोना व्हायरसशी लढण्यासाठी कार्लने पुढाकार घेतला होता. करोना व्हायरसशी लढण्यासाठी कार्लने एक लाख डॉलर एवढा मदत निधी गोळा केला होता आणि तो सरकारला दिला होता. पण आता कार्लची आईचे करोना व्हायरसमुळे निधन झाले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here