करोना व्हायरसशी लढण्यासाठी भारतातील सर्वच जण सरसावले आहे. उद्योगपतींपासून खेळाडूंपर्यंत सर्वांनीच करोना व्हायरसशी लढण्यासाठी दान दिले आहे. या काळात जर एका रुपयाचे जरी दान दिले तरी ते मोठे आहे, असे वक्तव्य भारताचा माजी सलामीवीर आणि भाजपाचा खासदार गौतम गंभीरने केले आहे.

गंभीरने आपल्या दोन वर्षांचे वेतन करोना व्हायरसच्या लढ्यासाठी दिले आहे. गंभीरला दर महिन्याला खासदार म्हणून अडीच लाख रुपये एवढा पगार मिळतो. गंभीरने यावेळी दोन वर्षांचा आपला पगार मदतनिधीसाठी दिला आहे.

एका मुलाखतीमध्ये गंभीर म्हणाला की, ” सध्याच्या घडीला करोना व्हायरस एकत्रितपणे येऊन लढणे हे सर्वात महत्वाचे आहे. सध्याच्या घडीला देशभरात लॉकडाऊन आहे. या काळामध्ये देशवासिय आपल्या घरातच राहीले तर करोना व्हायरसशी लढण्यासाठी ही सर्वात मोठी मदत होऊ शकेल.”

गंभीर पुढे म्हणाला की, ” करोना व्हायरसशी लढण्यासाठी जेव्हा दान करण्याची गोष्ट येते तेव्हा कोणतीही सीमा त्या गोष्टीला नसते. त्यामुळे एखाद्या व्यक्ती चांगल्या मनाने फक्त एक रुपया जरी दान केल तरी ती मोठी गोष्ट आहे. आपण करोना व्हायरसविरुद्धची लढाई तेव्हाच जिंकू शकतो जेव्हा आपण सर्व एकत्र येऊ. त्यामुळे सध्याच्या घडील सरकारच्य नियमांचे पालन करणे ही सर्वात मोठी गोष्ट आहे. जर सरकार तुम्हाला सांगत असेल की, तुम्ही घरातच राहा, तेच तुमच्यासाठी सर्वात सुरक्षित आहे. तर लोकांनी या गोष्टीचे पालन करायला हवे, कारण सरकार लोकांच्या भल्यासाठीच या गोष्टी सांगत आहे. सरकार आपल्या भल्यासाठीच सर्व सांगत आहे, असा जर विचार केला तर आपल्यासाठी सर्व काही सोपे होऊन जाईल.”

सध्याच्या घडीला गंभाीर काय करतोय, हा प्रश्नदेखील तुम्हाला पडला आहे. गंभीर लॉकडाऊनमध्ये आपल्या घरीच आहे. आपल्या घरातील बगिचा सांभाळण्याची जबाबदारी त्याला देण्यात आली आहे. त्यामुळे गंभीर सध्या झाडं लावण्यात आणि त्यांचे पालनपोषण करण्यात व्यस्त असल्याचेच दिसत आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here