याबाबत मॅग्राने सांगितले की, ” सचिन आणि लारा हे दोघेही महान फलंदाज होते. पण सचिनच्या तुलनेत मला गोलंदाजी करताना जास्त समस्या जाणवायची.”
जर क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घ्यायची असेल, तर कोणत्या तीन फलंदाजांना तू आऊट करू इच्छितो, असा प्रश्न विचारल्यावर मॅग्रा म्हणाला की, “मला हॅट्ट्रिक घ्यायची असेल, तर मी पहिल्यांदा लारा, त्यानंतर सचिन आणि त्यानंतर राहुल द्रविडला बाद केले असते. कारण त्यावेळी हे तिन्ही फलंदाज सर्वोत्तम असेच होते. प्रत्येक फलंदाजाची शैली ही नक्कीच वेगळी होती. त्यामुळे त्यांना चेंडू टाकताना बराच विचार करावा लागायचा. हे तीन फलंदाज एकहाती सामना फिरवू शकत होते, कारण त्यांच्या फलंदाजीमध्ये तेवढी ताकद नक्कीच होती. त्यामुळे या तीन फलंदजांना बाद करून हॅट्ट्रिक घेणे मला नक्कीच आवडले असते.”
जगातील सर्वोत्तम गोलंदाज कोण…सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम गोलंदाज कोण वाटतो, या प्रश्नाचे उत्तर देताना मॅग्रा म्हणाला की, ” सध्याच्या घडीला मला ऑस्ट्रेलिच्या पॅट कमिन्सची गोलंदाजी आवडते. कारण सध्याच्या घडीला तो जी गोलंदाजी करत आहे त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.”
गोलंदाजीत कोणते अस्त्र नव्हते…तुझ्या गोलंदाजीमध्ये कोणते अस्त्र नव्हते, असा प्रश्न यावेळी मॅग्राला विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना मॅग्रा म्हणाला की, ” माझ्या गोलंदाजी अस्त्रांमध्ये वेगवान चेंडू नव्हता. कारण मला तासाला १०० मैल एवढ्या वेगाने चेंडू टाकता येत नव्हता.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times