सध्याच्या घडीला धोनी भारतीय संघातकडून खेळणार की नाही, याबाबत चर्चा सुरु आहे. आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर धोनीला ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या संघात स्थान देण्यात येणार होते. पण आता आयपीएल कधी होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे आता धोनीला भारतीय संघात स्थान मिळणार की धोनीला आंतरारष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करावा लागणार, अशा चर्चा सध्या रंगत आहेत.
केदार भारताकडून आतापर्यंत ७३ सामने खेळला आहे. विश्वचषकात खेळण्याची संधीही केदारला मिळाली होती. पण काही दिवसांपूर्वी जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतामध्ये आला होता, तेव्हा त्यांच्याविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी केदारला भारतीय संघात स्थान देण्यात आले नव्हते.
केदार म्हणाला की, ” भारतासाठी मी कदाचित ८-१० सामनेच खेळू शकलो असतो. पण मला धोनीने सांभाळून घेतले आणि पाठिंबा दिला. धोनीमुळेच मी भारतासाठी जास्त सामने खेळू शकलो. जर धोनी नसला असता तर मला भारताकडून खेळण्याची जास्त संधी मिळू शकली नसती.”
केदार पुढे म्हणाला की, ” जेव्हा मी क्रिकेट पाहून मोठा होत होतो तेव्हा माझे आदर्श सचिन तेंडुलकर होते. पण जेव्हा मी भारतीय संघात आलो तेव्हा धोनी हा माझा आदर्श बनला. कारण धोनी हा कामगिरीबाबत कडक शिस्तीचा होता. त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे सांगेल ते करून दाखवण्याची धमक होती. त्यामुळे धोनीनंतर मला एकही आदर्शवत खेळाडू पाहायला मिळाला नाही.”
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा एक महान क्रिकेटपटू आहे. त्यामुळे त्याला ट्वेन्टी-२० विश्वचषकातील संघात निवड समितीने स्थान द्यायला हवे, असे मत भारता फिरकीपटू हरभजन सिंगने व्यक्त केले आहे.
हरभजन म्हणाला की, ” धोनी हा एक महान क्रिकेटपटू आहे. त्याचबरोबर आतापर्यंतच्या क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी तो एक आहे. त्यामुळे त्याला संघात निवडण्यासाठी आयपीएल हाच फक्त एक निकष होऊ शकत नाही. धोनीसाठी तुम्ही निकष पाहणार की, त्याने आतापर्यंत भारतीय क्रिकेटला जे काही दिले त्यानुसार त्याचा सन्मान करणार, हे निवड समितीने ठरवायला हवे.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times