भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा एक महान क्रिकेटपटू आहे. त्यामुळे त्याला ट्वेन्टी-२० विश्वचषकातील संघात निवड समितीने स्थान द्यायला हवे, असे मत भारता फिरकीपटू हरभजन सिंगने व्यक्त केले आहे.

हरभजन म्हणाला की, ” धोनी हा एक महान क्रिकेटपटू आहे. त्याचबरोबर आतापर्यंतच्या क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी तो एक आहे. त्यामुळे त्याला संघात निवडण्यासाठी आयपीएल हाच फक्त एक निकष होऊ शकत नाही. धोनीसाठी तुम्ही निकष पाहणार की, त्याने आतापर्यंत भारतीय क्रिकेटला जे काही दिले त्यानुसार त्याचा सन्मान करणार, हे निवड समितीने ठरवायला हवे.”

तो पुढे म्हणाला की, ” धोनी हा एक दिग्गज क्रिकेटपटू आहे. सध्याच्या घडीला तो फिटही आहे. धोनीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. या गोष्टीचा फायदा भारतीय संघाला नक्कीच होणार आहे. सध्या धोनी निवडीसाठी उपलब्धही आहे. त्यामुळे जास्त विचार न करता निवड समितीने धोनीला संघात स्थान द्यायला हवे.”

काही दिवसांपूर्वी भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनीही धोनीला संघात स्थान द्यायला हवे, असे म्हटले होते. धोनीमध्ये अजून बरेच क्रिकेट बाकी आहे. तो अजून दोन वर्षे तरी आयपीएल खेळू शकतो. तो फिट आहे आणि निवडीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे निवड समितीने धोनीला भारतीय संघात स्थान द्यायला हवे. यासाठी निवड समितीने संघाचा कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्याशी चर्चा करावी आणि धोनीला संघात स्थान द्यावे, अशी भूमिाका या दोघांनीही यापूर्वी घेतली होती.

भारतातील लॉकडाऊन वाढवल्यानंतर बीसीसीआयने अखेर यंदाची आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयकडून याबाबतचे एक पत्रक काढण्यात आले आहे. यामध्ये बीसीसीआयने यंदाची आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.

केंद्र सरकारने भारतामधील लॉकडाऊन हे १४ एप्रिलपर्यंत ठेवले होते. त्यानंतर आता लॉकडाऊन हे ३ मेपर्यंत वाढवण्यात आले आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या गव्हर्निंग कौन्सिलने आज यंदाच्या आयपीएलबाबत एक निर्णय घेतला आहे. यापुढील आदेश येईपर्यंत बीसीसीआयने आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here