Rishabh Pant Girlfriend Isha Negi Message : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आजपासून पाच सामन्याच्या टी 20 मालिकेला सुरुवात झाली आहे. पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. नाणेफेकीवेळी ऋषभ पंतने सर्वांचं लक्ष वेधलं. कारण, 24 वर्षीय पंत आज भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे. केएल राहुलला दुखापत झाल्यामुळे ऋषभ पंतकडे भारतीय संघाची धुरा सोपवण्यात आली. बुधवारी संध्याकाळी बीसीसीआयने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली होती. 

ऋषभ पंतला भारतीय संघाचं नेतृत्व मिळताच गर्लफ्रेंड ईशा नेही हिनं खास मेसेज पोस्ट केलाय. इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे ऋषभ पंतसाठी ईशा नेगीनं स्पेशल मेसेज पोस्ट केलेय. यात तिनं थँकफूल, ग्रेटफुल आणि ब्लेस्ड फील असं म्हटलेय. ऋषभ पंतला भारतीय संघाचा कर्णधार म्हणून घोषीत केल्यानंतर  ईशानं ही  स्टोरी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. त्यामुळे ईशाच्या पोस्टच्या टायमिंगची आता जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर या पोस्टबाबत चर्चा सुरु आहे. 

पाहा ईशा नेगीची इन्स्टा स्टोरी – 

आयपीएल सामन्यावेळी दिसली होती ईशा –   
ईशा नेगी (Isha Negi) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) मागील काही वर्षांपासून एकमेंकाना डेट करत आहेत. आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या एका सामन्यावेळी ईशा नेगी स्टेडिअममध्ये दिसली होती. तेथील तिचे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले होते. ईशा नेगी सोशल मीडियावर सक्रिय असते.. ती फोटो आणि व्हिडीओ चाहत्यासाठी पोस्ट करत असते.  ऋषभ पंत मूळचा उत्तराखंडचा असला तरी त्याचं संपूर्ण बालपण आणि ट्रेनिंग दिल्लीत झालं आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये पंत दिल्लीकडून खेळत आला आहे.  

रोहित आणि राहुलच्या अनुपस्थितीत पंतकडे भारतीय संघाचं नेतृत्व आलेय. आंतरराष्ट्रीय सामन्यात पंतला नेतृत्व करण्याचा अनुभव नाही. पण आयपीएलमध्ये दिल्ली संघाचं नेतृत्व सांभाळण्याचा अनुभव पंतच्या पाठीशी आहे. आयपीएल 2022 मध्ये दिल्ली गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर होती. तर 2021 मध्ये दिल्ली क्वालिफायर सामना खेळली होती. धोनीचा वारसा चालवण्याचा पंत नक्कीच प्रयत्न करेल. धोनीप्रमाणेच पंतही खेळाडूंना सपोर्ट करत असल्याचं म्हटलेय जातेय. 

sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here