वाचा-
भारत आणि श्रीलंका यांच्या इंदूर येथे वनडे सामना सुरू होता. तेव्हा धोनीला कुलदीप यादव याच्यावर प्रचंड राग आल्याचा एक प्रसंग कुलदीप यादवने सांगितला. या सामन्यात रोहित शर्माने शतकी खेळी केली होती. कुलदीप म्हणाला, मी गोलंदाजी करत असताना कुसल परेराने माझ्या चेंडूवर कव्हरच्या दिशेने चौकार मारला. त्यानंतर धोनीने विकेटच्या मागून कव्हरच्या येथील फिल्डर हटवण्यास आणि क्षेत्ररक्षणात काही बदल करण्यास सांगितले. ही गोष्ट मला ऐकू आली नाही. परेराने दुसऱ्या चेंडूवर पुन्हा रिव्हर्स स्वीपने चौकार मारला.
वाचा-
दुसरा चौकार मारल्यानंतर धोनी माझ्या जवळ आला. तो प्रचंड रागावला होता. म्हणाला, मी वेडा आहे का? ३०० वनडे खेळल्या आहेत आणि तुला समजावतोय. धोनीचा तो राग पाहून मला भीती वाटल्याचे यादव म्हणाला.
सामना झाल्यानंतर मी धोनीकडे गेलो आणि विचारले तुला देखील राग येतो का? यावर धोनी म्हणाला, मला २० वर्षापूर्वी राग येत होता. तेव्हा मी रणजी ट्रॉफी खेळायचो. टीम इंडियाकडून खेळताना मला २ ते ३ वेळा राग आला आहे. पण आता मी रागवत नाही तर समोरच्या व्यक्तीला चूक दाखवून देतो.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times