नवी दिल्ली: करोना व्हायरसपासून बचावासाठी देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. भारतात पसरण्यास ” जबाबदार असल्याचे अनेकांचे मत आहे. असेच मत भारताच्या एका महिला कुस्तीपटूने व्यक्त केले. सोशल मीडियावर हे वक्तव्य केल्यानंतर संबंधित खेळाडूला ट्रोल केले जात आहे.

वाचा-
करोनामुळे भारतावरच नव्हे तर संपूर्ण जगावर परिणाम झाला आहे. चीनमधून सुरूवात झालेल्या या व्हायरसमुळे काही हजार जणांचा मृत्यू झाला. यापासून बचाव करण्यासाठी देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. या दरम्यान भारताची कुस्तीपटू बबीता फोगाटने ‘तबलिगी जमात’ संदर्भात एक ट्विट केले. यावरून ती आता ट्रोल होत आहे. काही लोकांनी बबीताचे ट्वीवटर अकाऊंट सस्पेंड करण्याची मागणी केली आहे.

वाचा-
अर्जुन पुरस्कार विजेत्या बबीताने, करोना व्हायरस भारताची दुसरी मोठी समस्या आहे. तर ‘तबलिगी जमात’ ही अद्याप नंबर एकवर आहे. तिच्या या ट्विटवरून अनेकांनी विरोध करण्यास सुरुवात केली.

वाचा-

अर्थात काही जण तिच्या समर्थनासाठी देखील पुढे आहे आहेत. यात कुस्तीपटू बजरंग पुनियाचा समावेश आहे. मिल्खा सिंग, मेरी कोम, पान सिंह तोमर, गीता आणि यांच्यावर चित्रपट तयार झाले आहेत. कारण ते या योग्य होते. सरकार खेळाडूंची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. खेळाडू देशासाठी संघर्ष करत आहेत आणि तुम्ही काय करत आहात, असा सवाल बजरंग पुनियाने विचारला आहे.

बबीताने तिच्या आणखी एका ट्विटमध्ये अभिनेत्री कंगणा रानावतची बहिण आणि मॅनेजर रंगोली चंदेलला पाठिंबा दिला आहे. काही दिवासांपूर्वी रंगोलीचे खाते ट्वीटर खाते सस्पेंड केले होते. रंगोलीने ‘तबलिगी जमात’ बद्दल वादग्रस्त ट्विट केले होते.

याआधी बबीताने एक ट्विट केले होते. त्यावरून वाद झाल्यानंतर ते ट्विट डिलीट केले.

‘तबलिगी जमात’ बद्दल बबीताने ट्विट केल्यानंतर तिचे अकाऊंट सस्पेंड करण्याची मागणी काही जण करत आहेत. तर काही लोक तिला पाठिंबा देत आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here